सावे येथे अवैध वाळू उपशावर कारवाई | पुढारी

सावे येथे अवैध वाळू उपशावर कारवाई

सांगोला : पुढारी वृत्तसेवा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगोला तालुक्यातील अवैधरित्या वाळू उपसा करणार्‍या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनंतर पोलिसांनी वाळू माफियांना दणका दिला असून, 3 कारवाया करत अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी तीन वाहनांसह दोन ब्रास वाळू असा 8 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या धडक कारवाईनंतर वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

सांगोला पोलिसांनी सावे गावात अवैधरीत्या वाळू उपसा करून एक पिकअप वाळू वाहतूक करत असताना देवकतेवस्ती, सावे येथे (एम.एच.10 ए.क्यू. 8273) हा पिकअप पोलिसांना पाहताच पिकअप चालक वाहन जागेवरच सोडून पळून गेला. पोलिसांनी या कारवाईत 2 लाख 30 हजार रुपयांचा पिकअप व 4 हजार रुपयांची अर्धा ब्रास वाळू असा 2 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसर्‍या कारवाईत याच परिसरात बिगर नंबरचा 407 टेम्पो या माण नदीच्या पात्रातून वाळू भरून जात असताना दिसून आला.

दरम्यान, पोलिसांना पाहताच टेम्पो चालक पळून गेलायात 3 लाख रुपयांचा टेम्पो व 8 हजार रुपयांची वाळू असा 3 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिसर्‍या घटनेत जवळा गावातील सरकारी दवाखान्यासमोर (सी.जी. 4783 एम.एच.04) हा टेम्पो अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याचा संशय आला. पोलिसांनी टेम्पो चालकास वाहन थांबवण्याचा इशारा केला. यावेळी पोलिसांनी टेम्पो आनंदा शंकर कोडग, खंडू कोडिंबा कर्चे दोघे रा. जवळा ता. सांगोला यांना ताब्यात घेतले

Back to top button