कुर्डूवाडीत ज्वेलर्स दुकान फोडून दोन लाखांचे दागिने चोरीस | पुढारी

कुर्डूवाडीत ज्वेलर्स दुकान फोडून दोन लाखांचे दागिने चोरीस

कुर्डूवाडी : पुढारी वृत्तसेवा येथील शहरात मध्यवर्ती गांधी चौकातील सराफ पेठेत दर्शन ज्वेलर्स हे दुकान चोरट्यांनी फोडून
1 लाख 94 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. कुर्डुवाडी हे जिल्ह्यातील सर्वात संवेदनशील पोलिस ठाणे असताना याठिकाणी पोलिस निरीक्षकपद गेली एक वर्ष झाले रिक्त आहे. अनेकवेळा मागणी करुनही जिल्हा पोलिस प्रमुखांनी ते पद भरले नाही. यामुळे कुर्डुवाडी शहर व परिसरात चोर्‍या तसेच अवैद्य व्यवसायात मोठी वाढ झाली आहे.

गांधी चौक येथील दर्शन ज्वेलर्स या दुकानचे चोरट्यांनी चॅनल गेट व त्यानंतर शटर तोडले. दुकानातील 1 लाख 85 हजारांच्या चांदीच्या वस्तूसह 9 हजार रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेरा मशिनही लंपास केले. याबाबत दर्शन सुरेंद्र देवी (वय 37 रा. कुर्डूवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवार, दि. 25 रोजी सकाळी 6 वाजता दुकान स्वच्छतेसाठी फिर्यादीचे वडील सुरेंद्र देवी दुकानात आले असताना दुकानाची कुलपे तोडल्याचे लक्षात आले.

पोलिसांनी श्वान पथकास पाचारण करण्यात आले. त्यापाठोपाठ फिंगर प्रिंट पथक आले. सोलापूर गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक नागनाथ खुणे व पथकानेही घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक येणार असल्याने दुकानात जाऊ नये, असे पोलिसांनी फिर्यादीस सूचना दिल्या होत्या. त्यामुळे प्रथमदर्शी 69 हजारांच्या चोरीची फिर्याद नोंद झाली. मात्र दुकान तपासानी नंतर खुशबू कंपनीचा पैंजण बॉक्स अंदाजे 1 लख 85 हजार रुपयांचा ऐवजही चोरी झाल्याचे निदर्शनात आले. पुढील तपास पोलीस हवलदार वाडगे करीत आहेत.
घटनास्थळी रात्री 2 ते 3 च्या सुमारास सदर परिसरात कुत्र्यांनी मोठा हौदास घातला. त्यामुळे मुख्य तिजोरी चोरांना फोडता आली नाही. चांदीचे पैजन 4 किलोचे चोरी झाली असताना पोलिसांनी केवळ 1 किलो पैजनची चोरी झाल्याची फिर्याद नोंदली आहे.

Back to top button