सोलापूर : खड्डे बुजविण्यास युद्धपातळीवर सुरुवात | पुढारी

सोलापूर : खड्डे बुजविण्यास युद्धपातळीवर सुरुवात

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाताहात झाली आहे. त्यामुळे रहदारी, वाहतुकीला होणारा प्रचंड अडथळा लक्षात घेता महापालिकेकडून शहरात सर्वत्र मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गत महिनाभरापासून शहरात सातत्याने पाऊस आहे. यामुळे आधीच खराब अवस्थेतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्डे, चिखलमय रस्त्यांवरून नागरिकांनाजाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात वाहने आदळून अपघात होत आहेत. शिवाय मान, पाठदुखीलादेखील सामोरे जावे लागत आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात चुकीच्या दिशेला वाहने जाऊन अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

सार्‍या शहरभरात ही स्थिती असून, नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल रोष वाढत आहे. नागरिकांची ओरड लक्षात घेऊन महापालिकेकडून प्रमुख रस्त्यांची डागडुजी सुरू आहे. वास्ताविक प्रिमिक्स टाकून खड्डे बुजविणे अपेक्षित आहे. मात्र, पावसात प्रिमिक्स टिकत नसल्याने त्याऐवजी मुरूम, आजोरा टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे. मनपाची शहरात एकूण 8 झोन कार्यालये असून, त्या त्या कार्यालयांकङून अखत्यारितील रस्त्यांची दुरुस्ती सध्या युद्धपातळीवर केली जात आहे. या दुरुस्तीमुळे काही प्रमाणात का होईना नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Back to top button