

महाड, पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील महाड वसाहतीमधील ब्ल्यूजेट केमिकल कंपनीत शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दुर्घटना होऊन 11 कामगार बेपत्ता झाले होते. त्यातील ३ कामगारांचे मृतदेह सुमारे ८० तासांच्या अथक प्रयत्नानंतर एनडीआरएफ पथकाने आज (दि.६) सायंकाळी बाहेर काढले. या दुर्घटनेत ११ कामगारांचा मृत्यू झाला असून सर्व कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती महाड तहसीलदार महेश शितोळे यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना दिली.
शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता ब्ल्यूजेट केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन वायू गळती झाली होती. यात ११ कामगार बेपत्ता झाले होते. सुमारे 24 तासांच्या प्रयत्नानंतर एनडीआरएफ पथकाने ८ कामगारांचे मृतदेह बाहेर काढले होते. त्यानंतर ३ कामगारांचे मृतदेह आज सायंकाळी सहानंतर बाहेर काढण्यात आले. त्यानंतर फॉरेन्सिक तपासणीसाठी सर्व मृतदेह पनवेल येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. दरम्यान, एनडीआरएफच्या पथकाचे सर्च ऑपरेशन पूर्ण झाल्याची माहिती महाड तहसील प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा