lucknow News : आर्मी एन्क्लेव्हची सीमा भिंत कोसळून 9 ठार

lucknow News : आर्मी एन्क्लेव्हची सीमा भिंत कोसळून 9 ठार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : मुसळधार पावसामुळे लष्कराच्या एन्क्लेव्हची सीमा भिंत कोसळल्याने लखनौमध्ये किमान नऊ जण ठार झाले, पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. "काही मजूर दिलकुशा परिसरात आर्मी एन्क्लेव्हच्या बाहेर झोपड्यांमध्ये राहत होते. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे आर्मी एन्क्लेव्हची सीमा भिंत कोसळली," असे पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पीयूष मोरडिया यांनी सांगितले. lucknow News

"आम्ही पहाटे ३ च्या सुमारास घटनास्थळी पोहोचलो. ढिगाऱ्याखालून नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात आले," असे ते म्हणाले. lucknow News

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शुक्रवारी दिल्लीत हलका पाऊस आणि ढगाळ आकाशाचा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीने सांगितले की, शहराचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 आणि 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या 24 तासांत राज्यभर मुसळधार पाऊस पडला, ही परिस्थिती शनिवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. lucknow News

उत्तर प्रदेशचे जिल्हा दंडाधिकारी सूर्यपाल गंगवार म्हणाले की, लखनौच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे शुक्रवारी 12वीपर्यंतच्या सर्व बोर्डांशी संलग्न शाळा बंद राहतील.

यूपीच्या सीएमओने ट्विटमध्ये म्हटले आहे की, भिंत कोसळण्याच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

तर उत्तरप्रदेशच्या आणखी एका घटनेत उन्नाव येथे काल रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे घराचे छत कोसळून दोन अल्पवयीन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. जखमीची ओळख 20 वर्षे, 4 वर्षे आणि 6 वर्षे वयोगटातील तीन मुलांची आई म्हणून झाली असून या सर्वांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल आहेत. lucknow News

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत व्यक्तिच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून 4 लाख रुपये तर जखमींना दोन लाख रुपये अनुदान जाहीर केले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news