आजचा दिवस कसा होता... या सारख्या छोट्या छोट्या गोष्टींची विचारपूस दोघांमधील जवळीक वाढवतात. यामुळं आपलं विचारपूस होते ही भावना निर्माण होते.
जसं बोलणं गरजेचं आहे तसं काळजीपूर्वक ऐकणं देखील गरजेचं आहे. जर पार्टनर एकमेकांचं बोलणं काळजीपूर्वक ऐकू लागले... विचारपूर्वक प्रश्न विचारू लागले तर नातं अधिक घट्ट होतं.
एक छोटसं थँक्यू आपल्या जोडीदारासाठी खूप महत्वाचं असतं. जर तुमच्या पार्टनरची मदत झाली असेल आणि तुम्ही साधं थँक्यू जरी म्हटला तरी त्यांचा सन्मान वाढतो.
नात्यात फक्त रोमान्स करून चालत नाही तर हात धरणं, मिठी मारण, सॉफ्ट टच अशा छोट्या छोट्या गोष्टी देखील तुमचं प्रेमळ नातं अधिक दृढ करतात.
आपल्या पार्टनरवरच सर्व भार न टाकता तुम्ही जर मिळून घरची कामं केली तर दोघांमधील प्रेम अधिकच वाढतं. तुमच्या पार्टनरवरचा भार हलका होतो.
एकमेकांना सरप्राईज देणं महत्वाचं असतं. कधी प्रेमाची एक छोटी नोट, चॉकलेट हळूच आपल्या पार्टनरला आणून देण्यानं आपल्या पार्टनरचा दिवस चांगला जातो.
फोन आणि स्क्रीन थोडी बाजूला ठेवून आपल्या पार्टनरसोबत थोडा वेळ घालवणं. त्याच्या किंवा तिच्यासोबत फिरायला जाण्यानं आपलं नातं अधिक घट्ट होतं.
एकमेकांच्या सहवासात असताना विनोद करणं, एकमेकांना हसवणं या गोष्टींमुळे वातावरण एकदम हलकं फुलकं बनतं. त्यामुळ नकळत एकमेकांसोबत कनेक्शन तयार होतं.