गरूड पुराणात सांगितलय 'बलात्कार' गुन्हा नव्हे पाप; शिक्षा ऐकून अंगावर काटा येईल

भारतीय समाजव्यवस्था केवळ राजसत्तेवर नव्हती तर धर्मशास्त्र, स्मृती आणि पुराणांवरही चालायची.
rape-punishment-in-ancient-india-manusmriti-garuda-purana
rape-punishment-in-ancient-india-manusmriti-garuda-purana
Published on
Updated on

भारतीय समाजव्यवस्था केवळ राजसत्तेवर नव्हती तर धर्मशास्त्र, स्मृती आणि पुराणांवरही चालायची. त्या काळात गुन्ह्यांना शिक्षा देताना कायद्याबरोबर धर्मग्रंथांचाही आधार घेतला जायचा. बलात्कार हा अत्यंत गंभीर गुन्हा मानला जात असल्यामुळे त्यासाठी अत्यंत कठोर शिक्षा ठरवण्यात आल्या होत्या.

rape-punishment-in-ancient-india-manusmriti-garuda-purana
Chandragrahana And Pregnancy | चंद्रग्रहणाचा गर्भवती महिलांवर खरंच परिणाम होतो का? जाणून घ्या सत्य

मनुस्मृतीतील शिक्षा

मनुस्मृतीनुसार जर एखाद्या पुरुषाने स्त्रीचे अपहरण करून तिच्याशी जबरदस्ती केल्यास, त्याला राजा त्वरित मृत्युदंड शिक्षा होती.
मनुस्मृतीच्या ८व्या अध्यायातील ३५२व्या श्लोकात स्पष्ट सांगितले आहे की, स्त्रीला जबरदस्तीने स्पर्श करणाऱ्या किंवा दुष्कृत्य करणाऱ्याला अशी शिक्षा द्यावी की समाजात इतरांना धडा मिळावा.
काही श्लोकांमध्ये तर असेही म्हटले आहे की बलात्काऱ्याला लोखंडाच्या गरम खाटेवर झोपवावे आणि तो मरेपर्यंत सोडू नये.

rape-punishment-in-ancient-india-manusmriti-garuda-purana
Horoscope 8 September 2025: 'या' राशीच्या आज नव्या संकल्पना यशस्वी होणार; आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

गरुड पुराणातील शिक्षा

गरुड पुराणात बलात्कार करणाऱ्यांसाठी नरकासमान शिक्षा सांगितल्या आहेत.

  • गुन्हेगाराला विषारी सापांच्या मधोमध फेकून द्यावे.

  • त्याला जंगली जनावरांकडून चिरडून मारले जावे.

  • काही ठिकाणी त्याला मल-मूत्र, रक्त, विषारी कीटकांनी भरलेल्या विहिरीत टाकले जावे आणि मृत्यूपर्यंत तिथे ठेवले जावे.
    गरुड पुराणात हेही नमूद आहे की जे पुरुष प्राण्यांशीही बलात्कार करतात त्यांना नुकील्या वस्तू गळ्यात लटकवून शरीर भेदून टाकावे.

rape-punishment-in-ancient-india-manusmriti-garuda-purana
Pitru Paksha 2025 | पितृ पक्षात त्रिपिंडी श्राद्ध का करतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आपस्तम्ब धर्मसूत्रातील शिक्षा

आपस्तम्ब धर्मसूत्रानुसार जर एखादा पुरुष चुकून स्त्रीच्या खोलीत गेला तर त्याला चेतावणी द्यावी. परंतु तो जाणूनबुजून अशा कृती करतो आणि दुष्कृत्य करतो तर त्याला मारहाण करून दंड ठोठवावा.
जर त्याने बलात्कार केला तर त्याचे जननेंद्रिय व अंडकोष छाटून टाकावेत, अशी कठोर शिक्षा ग्रंथात लिहिलेली आहे.

प्राचीन भारतात बलात्कारासारखा गुन्हा केवळ सामाजिक पातळीवरच नाही तर धार्मिक व नैतिक दृष्ट्याही अत्यंत गंभीर मानला जात होता. त्यामुळेच त्या काळात गुन्हेगाराला शिक्षा इतकी कठोर दिली जायची की समाजात इतरांनी कधीही असा पाप करण्याचा विचारही करू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news