

आजच्या धावपळीच्या जीवनात, विशेषतः ऑफिसमध्ये किंवा 'वर्क फ्रॉम होम'मध्ये अनेक लोकांना तासन्तास एकाच जागी बसून काम करण्याची सवय लागली आहे. कामाच्या वेळा वाढल्यामुळे शरीराची हालचाल कमी झाली आहे. ही 'बैठी जीवनशैली' तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होणे थांबते आणि चयापचय मंदावते, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
जर तुम्ही दिवसातून 6 ते 8 तासांपेक्षा जास्त वेळ बसून काम करत असाल, तर खालील ५ मोठ्या आरोग्य समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते:
जास्त वेळ बसून राहिल्याने शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) मंदावते. यामुळे शरीरात चरबी (Fatty Acids) जमा होऊ लागते.
यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोका 30 टक्क्यांपर्यंत वाढतो. तसेच, शरीरातील इन्सुलिनच्या कामावर परिणाम होऊन टाईप-2 मधुमेह (Type 2 Diabetes) होण्याचा धोका वाढतो.
एकाच जागी तासन्तास बसल्याने शरीरातील कॅलरी बर्न करण्याची प्रक्रिया जवळपास थांबते.
अन्न व्यवस्थित पचत नाही, ज्यामुळे पोटाभोवती आणि कंबरेभोवती चरबी जमा होते, परिणामी लठ्ठपणा (Obesity) वाढतो.
मणक्यावर ताण: जास्त काळ एकाच स्थितीत बसल्याने पाठीच्या मणक्यावर सतत दबाव येतो. यामुळे पाठदुखी, मानदुखी आणि खांदे दुखण्याची समस्या वाढते.
हाडांची घनता कमी: शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे हाडांची घनता कमी होते आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्यांचा धोका वाढतो.
तणाव आणि चिंता: अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे लोक जास्त वेळ बसून काम करतात, त्यांच्यामध्ये तणाव, चिंता आणि नैराश्य वाढते.
मेंदूवर परिणाम: शारीरिक हालचाल न केल्याने मेंदूचा रक्तप्रवाह आणि कार्यक्षमता कमी होते, ज्यामुळे स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमर सारख्या समस्यांचा धोकाही वाढू शकतो.
रक्त जमा होणे: जास्त वेळ बसून राहिल्याने पायांमधील रक्तवाहिन्यांमध्ये (Veins) रक्त जमा होऊ लागते.
यामुळे पायांना सूज येणे, मुंग्या येणे आणि व्हेरिकोज व्हेन्स (पायाच्या नसा फुगणे) ही गंभीर समस्या उद्भवू शकते.
ब्रेक घ्या: दर 30 ते 45 मिनिटांनी कामातून लहान ब्रेक घ्या. खुर्चीवरून उठा आणि 3-5 मिनिटे चाला.
स्ट्रेचिंग: बसल्या बसल्या मान, खांदे आणि पायांचे साधे स्ट्रेचिंग व्यायाम करा.
स्टँडिंग डेस्क: शक्य असल्यास, काही वेळ उभे राहून काम करण्यासाठी स्टँडिंग डेस्क वापरा.
शारीरिक हालचाल: लिफ्टऐवजी पायऱ्या वापरा. दुपारच्या जेवणानंतर १० मिनिटे चाला.
पाण्याचे सेवन: पुरेसे पाणी प्या, ज्यामुळे तुम्हाला बाथरूमसाठी उठावे लागेल आणि हालचाल होईल.