

जेवन बनवताना कुकर जळलाय? काळा पडलेला कुकर काही केलं तरी स्वच्छ होत नाही? मग हा घरगुती उपाय एकदा नक्की वापरून बघा. शून्य पैशात आणि कमी त्रासात तुमचा कुकर नवीन कुकर सारखा दिसायला लागेल आणि तुमच्या किचनची शोभा देखील अधिक वाढवेल.
घरात रोज जेवण करताना एखादवेळी असं होतं की, आपल्याकडून दाल, भात किंवा इतर काही पदार्थ कुकरमध्येच जळतो. अशावेळी कुकर आतून आणि बाहेरून पूर्णपणे काळपट होतो. अनेकजण तो रात्रभर पाण्यात भिजत घालतात आणि सकाळी कष्टाने स्क्रबर लावून साफ करतात. पण काही वेळा हे डाग इतके जिद्दी असतात की, कितीही घासलं तरी जात नाहीत. पण आता काळजी नको! आम्ही घेऊन आलोय एक खास आयडीया ज्यामुळे तुमचा जळलेला कुकर नवीन सारखा चमकू लागेल.
२ ते ३ चमचे बेकिंग सोडा
१ कप पांढरा सिरीका (White Vinegar)
पाणी
स्टील स्क्रबर
लिंबू
सर्वप्रथम जळलेला कुकर पाण्यात भिजवा.
त्यात २-३ चमचे बेकिंग सोडा टाका. बेकिंग सोडा हे जळलेले अन्न वेगळं करण्यास मदत करतो.
आता त्यात १ कप पांढरा सिरीका मिसळा.
कुकर गॅसवर ठेवा आणि १० ते १५ मिनिटं मंद आचेवर उकळा. लक्षात ठेवा, झाकण लावू नका.
उकळून झाल्यावर कुकर गॅसवरून खाली उतरवा आणि थंड होऊ द्या.
कुकर थंड झाल्यावर स्क्रबरच्या मदतीने सौम्यपणे घासा.
शेवटी लिंबाचा रस लावून एकदा पाण्याने स्वच्छ धुवा, यामुळे कुकर नवा असल्यासारखा चमकेल.
या पद्धतीचा वापर तुम्ही तांब्या, पातेलं किंवा स्टीलच्या इतर भांड्यांवरही करू शकता