

त्वचा निरोगी, उजळ व तरुण ठेवण्यासाठी केवळ महागड्या सौंदर्यप्रसाधनांवर अवलंबून राहण्याऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. या नैसर्गिक घटकांमध्ये दूध हे एक अत्यंत उपयुक्त व परिणामकारक पर्याय मानला जातो.
कच्चे किंवा किंचित आंबट झालेले दूध त्वचेच्या विविध समस्यांवर प्रभावी उपाय ठरते. यामध्ये लॅक्टिक आम्ल, अँटीऑक्सिडंट्स आणि त्वचेची स्वच्छता व पोषण करणारे घटक असतात. चला तर मग पाहूया, दुधाचा सौंदर्य दिनक्रमात समावेश का करावा आणि त्याचे कोणते फायदे मिळतात:
वाढत्या वयानुसार त्वचेवर सुरकुत्या येणे नैसर्गिक आहे. मात्र, असंतुलित आहार, प्रदूषण आणि सूर्यप्रकाशाच्या अति संपर्कामुळे झुर्र्या लवकर येतात. दूधामध्ये असणारे लॅक्टिक आम्ल त्वचेतील मृत पेशी दूर करते आणि नवीन त्वचा निर्माण होण्यास मदत करते. यामुळे त्वचा मृदू, मुलायम आणि तरुण दिसते.
रोजच्या धुळीमुळे आणि प्रदूषणामुळे त्वचेवर मृत पेशींचा थर साचतो. कच्च्या दुधाचा वापर केल्याने या मृत पेशी दूर होतात आणि त्वचा स्वच्छ व उजळ दिसते. दूध थेट चेहऱ्यावर लावता येते किंवा बेसन, हळद, मध आदींसोबत फेसपॅकमध्ये मिसळूनही वापरता येते.
सूर्याच्या प्रखर किरणांमुळे त्वचेवर टॅनिंग किंवा सनबर्न होऊ शकतो. थंड दूध कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला शितलता मिळते आणि दाह कमी होतो. यामधील लॅक्टिक आम्ल त्वचेला पोषण देऊन नैसर्गिकरीत्या दुरुस्त करतं.
थंडीमध्ये त्वचा कोरडी आणि खवखवलेली होते. अशा वेळी दूध हे उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर ठरते. दूध त्वचेत खोलवर शोषले जाते आणि त्वचेला ओलावा व पोषण प्रदान करते, ज्यामुळे त्वचा दीर्घकाळ मऊ व तजेलदार राहते.
कच्चे दूध त्वचेवरील अतिरिक्त तेल, धूळ आणि बॅक्टेरिया दूर करते. यामुळे त्वचा स्वच्छ राहते आणि मुरुमांची समस्या कमी होते. दररोज रात्री कापसाने दूध चेहऱ्यावर लावल्यास त्वचेमधील अशुद्धता दूर होऊन मुरुम कमी होतात.