

औसा, पुढारी वृत्तसेवा : औसा तालुक्यातील शिवली येथून औशाकडे येणार्या भरधाव कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्याने कार चालकासह जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास औसाजवळील नागरसोगा उड्डाणपुलाजवळ घडली. Latur Accident News
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवली येथून येणार्या कारने (एम एच 14/ बीई 9656) समोरून जाणार्या उसाच्या ट्रॅक्टरला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचे इंजिन 30 फुटावर लांब जावून पडले. माहिती समजताच घटनास्थळी पोलीस, रुग्णवाहिका,आरोग्य कर्मचारी व नागरिकांनी धाव घेतली. कार ट्रॅक्टरखाली पूर्णपणे दबल्यामुळे मृतदेह काढण्यात अडचणी आल्या. अखेरीस पहाटे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. औसा ग्रामीण रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन करण्यात आले. महेबूब मुन्नवरखान पठाण, जयप्रकाश मोतीराम बिराजदार, संजय बाबुराव रणदिवे ही मृत शिक्षकांची नावे आहेत. या अपघातात चालक राजेसाब नन्हु बागवान हा मरण पावला. या तिन्ही शिक्षकांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. Latur Accident News
अपघातात मरण पावलेे रणदिवे हे खरोसा येथील जि.प. शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी जयप्रकाश बिराजदार, तसेच आनंदवाडी शाळेतील शिक्षक महेबुब मुनवरखान पठाण हे होते. कारचालक बागवान हा किल्लारीचा होता. अपघातस्थळाचे दृश्य भयानक होते. मृतदेह काढण्यासाठी क्रेन, कटर, जेसीबीचा वापर करावा लागला.
हेही वाचा