सैफ अली खान भडकला; युजर्स म्हणाले, फालतू का अ‍ॅटिट्यूड! (video)

सेफ अली खान
सेफ अली खान

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री करिना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहे. दोघे एकत्र आले की, सोशल मीडियावर चर्चा सुरू होते. करिना आणि सैफ नुकतेच एकत्र दिसले. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

करिना आणि सैफ पार्टीतून परतत होते, तेव्हा इमारतीबाहेर रात्री पापाराझींनी गर्दी केली होती. यावेळी फोटो काढताना सैफ पापाराझींवर भडकल्याचे दिसून आले. सैफ आणि करिना हे मलायका अरोराच्या आईच्या वाढदिवसाच्या पार्टीतून रात्री उशिरा घरी परतले. यावेळी पापाराझींनी त्यांचे फोटो क्लिक करण्यासाठी गर्दी केली. अगदी इमारतीच्या दरवाज्यात प्रवेश करेपर्यंत पापाराझी फोटो क्लिक करत होते. यावेळी सैफ भडकला. एक काम किजीए, हमारे बेडरूम में आ जाईए, असे तो म्हणाला. यावेळी करिनाला हसू आवरले नाही.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर युजर्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. फालतू का अॅटिट्यूड! असे एकाने, तर त्यांच्यामागे धावण्याची काय गरज आहे, असे दुसऱ्या एकाने म्हटले आहे.

(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news