पुढारी ऑनलाईन : सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ईदच्या खास मुहूर्तावर प्रदर्शित झाला. फरहाद सामग्री याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपट सलमान खान आणि अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा झाला तरी अद्याप भारतात १०० गल्ला जमवता आला नाही. जगभरात या १५० कोटीचा आकडा पार केला आहे. हा चित्रपट अयशस्वी झाला कारण 'किसी का भाई किसी की जान' दाक्षिणात्य 'वीरम'चा रिमेक आहे.
दाक्षिणात्य 'वीरम' चित्रपट असंख्य लोकांनी पाहिला आहे. यात 'वीरम'चे सीन देखील कॉपी केले आहेत. चित्रपटातील कोणतीच गोष्ट किंवा सीन प्रेक्षकांच्या मनाला भिडला नाही. चित्रपटात विश्वास न बसणारे स्टेट दाखवण्यात आले आहेत. तगडी स्टार कारट असतानादेखील 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला आहे. अॅक्शन सीनमुळे प्रेक्षक निराश झाले आहेत.
वयाच्या ५७ व्या वर्षी सलमान खान याच्यावर चित्रित करण्यात आलेले सीन प्रेक्षकांना आवडले नाहीत. सस्पेन्स आणि थ्रिलरच्या काळात 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ज्या प्रकारे शेवटच्या टप्प्यात पोहोचतो. यावरून चित्रपटाचा क्लाय काय असणार आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे 'किसी का भाई किसी की जान' प्रेक्षकांना आवडली नाही.