राष्ट्रपतिपदासाठी सुशीलकुमार शिंदेंचे नाव?

राष्ट्रपतिपदासाठी सुशीलकुमार शिंदेंचे नाव?
राष्ट्रपतिपदासाठी सुशीलकुमार शिंदेंचे नाव?
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी युपीएकडून उमेदवार म्हणून सोलापूरचे सुपुत्र, गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांना दिल्लीतून 'हायकमांड'कडून निरोप आल्यानंतर ते सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी शिंदे यांची चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आजारी असल्याने रुग्णालयात आहेत. राष्ट्रपतीची निवडणूकही जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात अनेकांनी साथ सोडली. अशा परिस्थितीत सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देऊन त्यांच्या ज्येष्ठतेचा आणि एकनिष्ठतेचा काँग्रेसकडून पुन्हा एकदा सन्मान करण्याचा मानस असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news