रहिमतपूर परिसरात रानगव्याचा वावर

रहिमतपूर परिसरात रानगव्याचा वावर
रहिमतपूर परिसरात रानगव्याचा वावर
Published on
Updated on

कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा रहिमतपूर-वडूज मार्गावर कचरा डेपोलगत असलेल्या गज धरण परिसरात रानगव्याचा वावर दिसून आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेत शिवारातील कामाच्या व्यापात असलेल्या शेतकर्‍याला अनाहूतपणे भला मोठा रांन गवा उभा असल्याचे दिसून आल्याने त्याची क्षणार्धात घाबरगुंडी उडाली. त्याने तात्काळ माघार घेत शिवारातील इतर शेतकर्‍यांना ही माहिती दिली. सलग दोन ते दिवस रानगव्याचा शेत शिवारात वावर वाढल्याने याची माहिती वन विभागाला देण्यात आली.

वन विभागाने याची दखल घेत गज धरण परिसरातील शेतात व पाणवठ्यावर पाहणी केली असता रानगव्याच्या पायाचे ठसे आढळून आले. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी याचा शोध घेत असता केवळ एकाच रान गव्याच्या पायाचे ठसे दिसून आले.

कचरा डेपो लगतच देवदरी, अंभेरी घाट माथा, औंध घाटमाथा डोंगर परिसर असल्याने कळपातील चुकून एखादा रानगवा पाणी व चार्‍याच्या शोधात शेत शिवारात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली. शेतकर्‍यांनी रान गव्याची अनाठायी भीती न बाळगता सावधानता बाळगावी. रानगवा पुन्हा दिसताच तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news