रणबीर कपूरची दिग्दर्शन करण्याची इच्छा

ranbir kapoor
ranbir kapoor

पुढारी ऑनलाईन : रणबीर कपूर बॉलीवूडमधील एक आघाडीचा अभिनेता आहे. नुकताच त्याचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटात पहिल्यांदाच तो पत्नी आलिया भट्ट बरोबर झळकला होता. रणबीरकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. बॉलीवूडनंतर आता हॉलीयूमध्ये तो झळकणार अशी चर्चा आहे.

अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनिल कपूरपर्यंत या कलाकारांनी हॉलीवूडमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रणबीरने नुकतीच 'रेड सी' चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली. त्याला भविष्यातील कामाबद्दल विचारण्यात आले असता तो म्हणाला, मला नेहमीच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात रस होता. मात्र, वास्तविक मी एक चांगला लेखक नसल्याने मी हे धाडस करू शकत नाही.

मला लवकरच दिग्दर्शन सुरू करायचे आहे. आलियाच्या हॉलीवूड पदार्पणवर तो म्हणाला, ती लवकरच हॉलीवूडमध्ये दिसेल, मात्र माझा असा कोणताच विचार नाही. मी माझ्या देशात माझ्या भाषेतील चित्रपटांमध्ये काम करणार आहे यात मी खूश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news