सना : लग्नांमध्ये होणारा बेसुमार खर्च अनेक लोकांना परवडणारा नसतो. त्यामुळे देश-विदेशात सामूहिक विवाह सोहळ्यांची एक उपयुक्त पद्धत रूळत आहे. आता येमेनची राजधानी सना येथे एक हजार जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला.
येमेन हा देश एक दशकापेक्षाही अधिक काळापासून गृहयुद्धामुळे जर्जर झाला आहे. बिघडत्या अर्थव्यवस्थेमुळे अनेक तरुणांना लग्न करणेही कठीण बनले होते. त्यामुळे या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा समारंभ विश्व विकलांगता दिनाच्या एक दिवस आधी झाला.
या सोहळ्यात दिव्यांग जोडप्यांची संख्या मोठीच होती हे विशेष. कोणताही खर्च न करता एक हजार जोडप्यांना या सोहळ्यात वैवाहिक जीवनाचा शुभारंभ करण्याची संधी मिळाली. भव्य खुल्या जागेत झालेल्या या शानदार समारंभासाठी अनेक पाहुणेही उपस्थित होते.