मुझे जाने दो, बच्चों को सुबह स्कूल जाना है!: मीरा राजपूत

Mira Rajput
Mira Rajput

पुढारी ऑनलाईन : अभिनेता की पत्नी मीरा राजपूत आपल्या परिवाराबाबतच मुलांबाबत बरीच दक्ष असते. अलीकडेच एका इव्हेंटमध्ये त्यावेळी पापाराझीनी तिला घेरले, त्यावेळी जे उत्तर दिले, त्या उत्तराने इंटरनेटवर तिने युजर्सची मने जिंकली. बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर व मीरा यांना मोशाच, जैन ही दोन मुले आहेत.

वैवाहिक आयुष्यात पाऊल टाकण्यापूर्वी शाहिद व मीरा यांच्या आयुष्यात अनेक चढउतार राहिले असून चॉकलेट बॉय शाहिदचे नाव यापूर्वी करिना कपूर, प्रियांका यांच्या जोडले गेले आहे. पापाराढीकडून होणारे सर्व प्रकार पाहता मीरा त्यापासून शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करते आणि ही बाब फारशी लपून राहिली नाही. मूळ दिल्लीच्या असणाऱ्या मीराने वसंत व्हॅली स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले तर दिल्ली विद्यापीठातील श्रीराम कॉलेजमधून पदवी घेतली. इतकेच नव्हे तर तिने अमेरिकेत इंटर्नशिप देखील केली आहे.

आपल्या शालेय जीवनादरम्यान ती आदित्य लालसह रिलेशनमध्ये होती असे म्हटले जाते. पण नंतर तिने सूर शाहिदशी जुळले. अलीकडेच एका इव्हेंटमध्ये मीरा राजपूत एकटीच आली होती आणि तेथून निघत असताना पापाराझीनी तिच्याभोवती मोठा गराडा घातला. मीराला सर्व फोटोग्राफर्सनी पोझ देण्यास सांगितले, त्यावेळी ती स्पष्टपणे म्हणाली, मुझे जाने दो, मेरे बच्चों को सुबह स्कूल जाना है!.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news