मुंबईत उद्याने चौपाटी, मैदाने झाली खुली; रात्री १० पर्यंत मुभा

मुंबईत उद्याने चौपाटी, मैदाने झाली खुली; रात्री १० पर्यंत मुभा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत उद्याने  चौपाटी, मैदाने झाली खुली आहेत. मुंबईत उद्याने  चौपाटी, मैदाने सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत नागरिकांसाठी खुली राहणार आहेत. मात्र मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता यासह आवश्यक सर्व निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे.

मुंबई शहरातील कोरोना प्रादुर्भाव सध्या नियंत्रणात आहे.

कोविडवर नियंत्रण आणल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मिशन ब्रेक दी चेन मध्ये टप्प्याटप्प्याने उपाययोजना केल्या जात आहेत.

याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगरातील ८६० उद्याने, ३१८ मैदाने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे आता सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत खुली राहतील, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी जाहीर केले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातले होते. मुंबईत देखील मोठ्या संख्येने रुग्णसंख्या आढळून येत होती.

त्यामुळे राज्यासह मुंबईत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले होते.

आता कोरनोची रुग्णसंख्या वेगाने कमी येत असल्याने राज्य सरकारने मुंबईसह राज्यात टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनच्या निर्बंधातून दिलासा दिला आहे. त्यामुळे मुंबईतील उद्याने खुली करण्यात येणार आहेत.

राज्य सरकारने कालपासून मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे.

आता  मुंबईतील उद्याने, मैदाने, चौपट्या आणि समुद्र किनारे नागरिकांसाठी खुली करण्यात आले आहेत.

हेही वाचलं का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news