मिरजेत प्रेमविवाह केल्याने मुलाच्या घराची तोडफोड

मिरजेत प्रेमविवाह केल्याने मुलाच्या घराची तोडफोड

मिरज : पुढारी वृत्तसेवा मिरज शहरातील कमानवेस येथे प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलाच्या घरात घुसून साहित्यांची तोडफोड करून नासधूस करण्यात आली. याप्रकरणी मुलीकडील दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका मुलाने गल्‍लीतीलच मुलीशी प्रेमविवाह केला होता. संमतीशिवाय प्रेमविवाह झाल्याने मुलीकडील नातेवाईकांनी मुलाच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ केली. तसेच 'तुम्हाला सोडणार नाही', अशी धमकी देत घराचा दरवाजा तोडला.

त्यानंतर घरातील कपाट, पलंग, टीव्ही, फॅन, गॅस शेगडी यासह संसारउपयोगी साहित्यांची तोडफोड केली. त्यामुळे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एक महिला व मुलासही शिवीगाळ करून दमदाटी केली, असे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news