मिरज : दादर, तिरुपती एक्सप्रेस रद्द

मिरज : दादर, तिरुपती एक्सप्रेस रद्द

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज – लोंढा रेल्वे मार्गावर दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणार्‍या काही गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग वाळविण्यात आली आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये बेळगाव – शेडबाळ- बेळगाव पॅसेंजर आणि हुबळी- दादर -हुबळी एक्सप्रेसचा समावेश आहे. बेळगाव पॅसेंजर दि. 18 ते 29 तर हुबळी -दादर दि. 22 ते 28 आणि दादर -हुबळी एक्सप्रेस दि. 23 ते 29 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

तिरूपती- कोल्हापूर हरिप्रिया एक्सप्रेस दि. 22 ते 28 दरम्यान धारवाड पर्यंत धावणार आहे. तर कोल्हापूर- तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस दि. 23 ते 29 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. मात्र ही गाडी दि. 18 ते 21 दरम्यान कोल्हापूरमधून 90 मिनिटे उशिरा धावणार आहे. या मार्गावरून धावणार्‍या काही गाड्यांचे मार्ग देखील वळविण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news