अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाईन : इजिप्तच्या संस्कृतीमधील लोकांनी महापूर हा देवाचा आशीर्वाद मानला होता. कारण, महापूर आला की, जमीन सुपीक होते. त्यातून पिकपाणी चांगले येते. जणू काही वर्षातून एकदा महापूर देव घडवून आणतो. असा समज लोकांचा होता. इजिप्शीयन लोक मातीसाठी नील नदीच्या महापुरावर अवलंबून होते.
असं असलं तरी, नंतरच्या काळात महापूर हा माणसांसाठी विनाशकारी ठरला. एक नैसर्गिक आपत्ती म्हणून त्याची नोंद करण्यात आली. कारण, महापुरामुळे जनजीवन विस्कळीत होते. अमाप नुकसान सहन करावे लागते. काही महापुरांमळे तर जगाचा भूगोलच बदलून गेला आहे. असेच महत्वाचं गंभीर महापूर आपण जाणून घेऊ…
जाॅनस्टाऊनचा महापूर : ३१ मे १८८९ साली दुपारी ३ वाजण्याच्या सुमारे हा महापूर आला होता. प्रचंड पाऊस पडल्यामुळे पेनसिल्व्हेनियाच्या तलावातील पाण्याच्या दबावामुळे तलावावरील धरण फुटले. यातून तब्बल १ कोटी ६० लाख टन पाणी तलावातून बाहेर पडले.
या महापुरामुळे ४० फुटाने चिखाली पातळी वाढली होती. जाॅनस्टाऊनला इतका जबरदस्त फटका बसला की, १६०० इमारती पत्त्यांच्या पानासारखी कोसळली. २ हजार २०० लोक मृत्यूमुखी पडले. मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले.
चीनचा विनाशी महापूर : १९३१ मध्ये भर उन्हाळ्यात वादळ, हिमवर्षाव आणि मुसळधार पाऊस यामुळे चीनमध्ये मोठा महापूर आला. या महापुराने चीनच्या हवामानाचा इतिहासच बदलून टाकला. त्यावेळी दीड वर्षात सरासरी जितका पाऊस पडतो, तितका पाऊस जुलै महिन्यात पडला.
परिणामी, यांग्त्झी, येलो आणि हुआई नद्यांना पूर आला. हा महापूर इतका मोठा होता की, इंग्लंडच्या आकाराएवढ्या मोठ्या क्षेत्रात पाणीच पाणी झाले. त्यातून हजारो लोक बुडून मृत्यूमुखी पडले. त्यातून काॅलरा, टाईफाॅईड, ताप या आजारांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला. त्यातच तब्बल ३७ लाख माणसांचा बळी गेला.
द ग्रोट मॅनड्रेन्कचा महापूर : इसवी सन १३६२ मध्ये उत्तर समुद्रावर आलेल्या वादळामुळे द ग्रोट मॅनड्रेन्क येथे हा महापूर आला होता. या वादळाचा परिणाम पहिल्यांदा इंंग्लंडमध्ये जाणवाला. एका व्यक्तीने याबद्दल लिहून ठेवले आहे की, "उत्तरेकडून दिवस-रात्र सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामुळे झाडे, मोठमोठ्या गिरण्या आणि चर्च भूईसपाट झाले.
नेदरलॅन्ड, जर्मनी आणि डेन्मार्क येथे या महापुराचा फटका बसला. त्यात सुमारे २५ हजार माणसं बुडून गेली. असं सांगितलं जातं की, या महापुरामुळे तेथील भूगोलच बदलला. समुद्रात असणारी बेटं पूर्णपणे समुद्रात बुडून गेली. डेन्मार्कचा काही भाग कायमाचच समुद्राच्या पोटात गेला.
सिंधू नदीचा महापूर : जगाच्या इतिहासातील अनेक महापुरांची तुलना १८४१ मध्ये सिंधू नदीच्या खोऱ्यात आलेल्या महापुराशी केली जात. त्या वर्षीच्या जानेवारीच्या अखेरीस नांगा पर्वत आणि हिमालय पर्वताच्या शिखरावर मोठे भूकंप झाले होते. परिणामी, फुटलेले डोंगर नदीत कोसळले. त्यामुळे नदीचा प्रवाह थांबला. नैसर्गिक धरण तयार होऊन पाणी साठण्यास सुरुवात झाली.
जवळजवळ ५०० फूट खोल इकते मोठे ते धरण तयार झाले होते. जून महिन्याच्या अखेरीस हे धरण फुटले आणि ५ लाख ४० लाख घनमीटर प्रति सेकंद या वेगाने पाणी वाहायला लागले. त्यातून हा मोठा पूर आला. सिंधू खोऱ्याच्या शंभर मैलांवर त्याचा परिणाम झाला. आजुबाजूची गावे नकाशातूनच गायब झाली. ५०० शिख सैनिक यामध्ये मृत्यूमुखी पडली.
इतर गंभीर महापूर : १९२७ मसिसीपी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला होता. यामध्ये २५० लोक मृत्यूमुखी पडले, तर १० लाख लोकांना स्थलांतरीत करण्यात आले होते. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी १ टक्के लोकांना या महापुराचा फटका बसला होता. ४ नोव्हेंबर १९६६ रोजी अर्नो नदीला पूर आलेला होता. यामध्ये १८ अब्ज गॅलन इतका चिखल साठलेला होता. यामध्ये १५ लाख पुस्तकं बुडून गेली होती.
पहा व्हिडीओ : मधमाशांनी बनवले दयावानचे आयुष्य मधाळ