भारताकडून अफगाणिस्तानला १०,००० मेट्रिक टन गव्हाची मदत |

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताकडून अफगाणिस्तानला  १०,००० मेट्रिक टन गहू देऊन मदत केल्याची माहिती युनायटेड नेशन्स वर्ल्ड फॉर फूड प्रोग्रामकडून (United Nations World for Food Programme) देण्यात आली आहे. अफगाणिस्तान (Afghanistan) सध्या तीव्र अन्न संकटाशी झुंजत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने ही मदत केली आहे.

युनायटेड नेशन्स वर्ल्ड फॉर फूड प्रोग्रामकडून (UNWFP) भारताने केलेल्या मदतीबाबतचे एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मंगळवारी (दि. ४) १०,००० मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानच्या हेरात शहरात पोहोचला.

गेल्या महिन्यात भारत सरकारने देशातील मानवतावादी संकटा दरम्यान इराणच्या चाबहार बंदराचा वापर करून २०,००० मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवला.

अफगाणिस्तानच्या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मदत वितरणाच्या माध्यमांचा विस्तार करून अफगाणिस्तानच्या स्थिरता आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत आपले समर्पण दाखवत आहे. तालिबानच्या अधिपत्याखालील अफगाणिस्तानला सर्वात वाईट मानवतावादी संकटाचा सामना करावा लागत आहे. देशातील महिलांना मूलभूत अधिकार नाकारण्यात आले आहेत. जागतिक अन्न कार्यक्रमाच्या मूल्यांकनानुसार, अफगाणिस्तान हा अत्यंत अन्न असुरक्षितता असलेल्या देशांपैकी एक आहे, ज्यामध्ये नऊ दशलक्ष लोक गंभीर आर्थिक संकटे आणि उपासमारीने ग्रस्त आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news