बेळगावच्या खेळाडूंना धोनीचे मार्गदर्शन लाभणार

बेळगावच्या खेळाडूंना धोनीचे मार्गदर्शन लाभणार
बेळगावच्या खेळाडूंना धोनीचे मार्गदर्शन लाभणार

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा खेळाडूंना सर्वोत्तम दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांना जागतिक पातळीवर संधी देणे हे एम. एस. धोनी स्पोर्ट्स अकादमीचे उद्दिष्ट आहे. यावेळी अत्याधुनिक क्रीडा उपकरणे, तज्ज्ञ प्रशिक्षक असणार असून क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती एम. एस. धोनी स्पोर्ट्स अकादमीचे संचालक मिहिर दिवाकर यांनी दिली. एका खासगी हॉटेलात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या अ‍ॅकॅडमीत अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घेतल्यास त्यातून चांगली गुणवत्ता बाहेर पडण्यास मदत होणार आहे. येत्या सहा महिन्यात देशभरात 60 अकादमी सुरू करण्याचा मानस आहे. विदेशात सिंगापूर, दुबई, अमेरिका, लंडन , कॅनरा येथेही शाखा सुरू करण्यात येणार आहेत. श्रीलंका संघाचे माजी प्रशिक्षक डेव्ह व्हॅटमोर यांचेही खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे. सहा वर्षापासून वरील मुलांना या अकादमीत सहभागी होता येणार आहे.

जैन हेरिटेज स्कूलचे प्राचार्य डॉ. मनजीत जैन म्हणाले, जैन हेरिटेज स्कूलमध्ये 15 जून रोजी मिहिर दिवाकर यांच्या हस्ते धोनी स्पोर्ट्स अकादमीचे उद्घाटन करण्यात आले आहे. रोज शाळेच्या वेळेत दोन तास प्रशिक्षण उपलब्ध असणार आहे. खेळाडूंना अद्ययावत पध्दतीने क्रिकेट व अन्य खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

जैन हेरिटेज स्कूलच्या संचालिका श्रध्दा खटवटे म्हणाल्या, बेळगावातील खेळाडूंना जागतिक पातळीवर खेळण्यासाठी तयार करणे हा अकादमीचा निर्धार आहे. आर.जी. धारवाडकर यांनी बोलताना या अकादमीत क्रिकेटसह बॅडमिंटन, जतरण, टेबल टेनिस व इतर खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सर्वाधिक यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंग धोनी यांचे मार्गदर्शन मिळणार असल्याने ही बेळगावकर खेळाडूंसाठी पर्वणी आहे. यावेळी अर्का स्पोर्ट्सचे उपव्यवस्थापक सिकंदर हेयात, अमी दोशी आदी उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news