परभणी : सेलमोह्याचा शेंड्या ६ महिन्यांसाठी पिंपळदरी पोलिसांकडून हद्दपार

परभणी : सेलमोह्याचा शेंड्या ६ महिन्यांसाठी पिंपळदरी पोलिसांकडून हद्दपार
Published on
Updated on

गंगाखेड; पुढारी वृत्‍तसेवा

तालुक्यातील सेलमोहा येथील गुंड प्रवृत्तीचा इसम माधव उर्फ शेंड्या दिगंबर सानप यास पिंपळदरी पोलिसांनी विविध गुन्ह्यांच्या कलमांखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून परभणी जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपार केले. याबाबतची माहिती पिंपळदरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी 'पुढारी' शी बोलताना दिली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पिंपळदरी पोलीस ठाणे अंतर्गत गावातील गुंड प्रवृत्तीचा इसम माधव उर्फ शेंड्या दिगंबर सानप याच्याविरुद्ध सन २०१६ ते २०२१ पर्यंत घातक हत्यार, साधनांनी इच्छापूर्वक दुखापत व जबर दुखापत करणे, गृहअतिक्रमण करणे, विनयभंग करणे, शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, बाललैंगिक कायद्याने बालकावर अत्याचार करणे, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

त्याच्या अशा हालचाली आणि कृती सर्वसामान्य व्यक्तींच्या तसेच मालमत्तेच्या सुरक्षितेस धोका पोहोचणारी असल्याने त्यास हद्दपार करण्यासाठीचा प्रस्ताव पिंपळदरी पोलीस ठाणे प्रभारी यांनी उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांना सादर केला होता. सदर प्रकरणाच्या सुनावणीवरुन आरोपी माधव उर्फ शेंड्या यास परभणी जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपार केले असून नुकतेच पथकाने हद्दपार क्षेत्राच्या बाहेर सोडले असल्याची माहिती पिंपळदरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news