नायलॉन मांजा विकल्यास दुकानांवर बुलडोझर चालेल; केवळ दुकान सील करणार नाही तर…

नायलॉन मांजा विकल्यास दुकानांवर बुलडोझर चालेल; केवळ दुकान सील करणार नाही तर…

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मकर संक्रांतीच्या सणानिमित्ताने शहरात मोठ्याप्रमाणात पतंगबाजी होतात. परंतु, यात नायलॉन मांजाचा वापर करणे टाळावे. तसेच विक्रेत्यांनीही हा मांजा विक्री करू नये. नसता संबंधितांवर गुन्हे दाखल करून दुकाने सील करण्याची कारवाई सुरूच आहे. परंतु, यासोबतच आता मनपा प्रशासन त्या दुकानांची बांधकाम परवानगी तपासून ती अनधिकृत असेल तर त्यावर बुलडोझर चालवून जमीनदोस्त करेल, असा इशारा देखील प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.

शहरात सध्या संक्रांत सणानिमित्ताने पतंगाची दुकाने थाटली आहे. विविध भागांत ही दुकाने असून त्यातून विविध प्रकारचे मांजे विक्री केले जात आहे. यात साध्या मांजासह नायलॉन मांजाची देखील विक्री होत आहे. शिवाय पतंगबाज नायलॉन मांजालाच सर्वाधिक पसंती देत आहेत. परंतु, शहरात जेव्हापासून या नायलॉन मांजाविरोधात मनपा व पोलिस प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. तेव्हापासून विक्रेत्यांनी या मांजाची विक्री छुप्या पद्धतीने सुरू केली आहे. तसेच या मांजाचे दरही विक्रेत्यांनी मोठ्याप्रमाणात वाढविले आहे. परंतु, असे असले तरी अजूनही या मांजाची मागणी मोठ्याप्रमाणात सुरू आहे. तसेच अनेक जण याच मांजाचा वापर करीत आहे.

दरम्यान, संक्रांत हा सण एकमेकांशी गोड बोलण्याचा आहे. अशात प्रत्येकाने कुणालाही इजा होणार नाही. याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे सांगत प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले शहरात पंतग उडवताना अनेकजण सर्रासपणे धोकादायक नायलॉन मांजाचा वापर करीत आहे. हे चुकीचे असून या मांजावर बंदी आहे.

15 जणांवर गुन्हे दाखल

शहरात नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात पोलिस आणि मनपा प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. दररोज तीन ते चार जणांवर गुन्हे दाखल होत आहे. आठवडाभरात सुमारे 15 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करून नायलॉन मांजाच्या शेकडो चरक्या जप्त करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news