बेळगाव : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीसह युवकाचा खून, पतीसह तिघांना फाशीची शिक्षा

दुहेरी खून : तिघांना फाशीची शिक्षा
दुहेरी खून : तिघांना फाशीची शिक्षा
Published on
Updated on

चिकोडी : पुढारी वृत्तसेवा : शेजारच्या युवकाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नी आणि त्या युवकाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पतीसह तिघा तरुणांना फाशीची शिक्षा चिकोडी अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर तिघाही गुन्हेगारांना चिकोडीहून हिंडलगा कारागृहात हलवण्यात आले आहे. 2013 साली झालेल्या दुहेरी खूनप्रकरणी चिकोडी अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एल. चव्हाण यांनी तिन्ही आरोपीना फाशीची शिक्षा सुनावली.

पती बाबू मुतप्पा अकळे (वय 33), नागप्पा मुतप्पा अकळे (30), मुतप्पा भीमप्पा अकळे (29) (सर्व रा. ममदापूर के. के., ता. चिकोडी) अशी फाशीची शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. चिकोडी पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या ममदापूर के. के. या गावातीलच संगीता बाबू अकळे (वय 20) हिचे घराच्या शेजारी असलेल्या बसवराज प्रभाकर बुर्जी (वय 24) याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय पती बाबू अकळे याला होता. ते दोघेजण फोनवरून बोलत असल्याचे ऐकून पती बाबूने दोन मित्रांच्या मदतीने 22 ऑक्टोबर 2013 रोजी रात्री 10.30 वाजता बसवराजच्या घरी जाऊन त्याला ओेढत बाहेर आणले आणि घराच्या मागे असलेल्या बाभळीच्या झाडाला दोरीने बांधले.

त्यानंतर घरात असलेल्या पत्नीलादेखील ओढत आणून त्याच झाडाला बांधून कोयत्याने बसवराज व संगीता यांचा निर्घृण खून केला
होता. तसेच भांडण सोडविण्यास गेलेला फिर्यादी शिवानंद बुर्जी यांच्यावरही हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस स्थानकात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सीपीआय शंकर रागी यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. नऊ वर्षानंतर बुधवारी याप्रकरणी चिकोडी जिल्हा सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा सुनावली. सुनावणीवेळी न्यायालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी सर्व आरोपींना चिकोडी न्यायलयातून बेळगांव हिंडलगा कारागृहात बंदोबस्तात वाहनाने नेण्यात आले.
मयत बसवराज यांची आई अरुणा बुर्जी म्हणाल्या, माझा मुलगा परत येणार नाही. पण, आरोपींना शिक्षा झाल्याचे समाधान वाटले.

20 वर्षानंतर फाशीची शिक्षा

बेळगाव जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांत फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचे पहिले प्रकरण आहे. तसेच चिकोडी येथे 2013 साली अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय झाल्यापासून फाशीची शिक्षा सुनावल्याचे पहिलेच प्रकरण आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news