दुचाकीच्या सीटवर चक्क बनवला डोसा!

दुचाकीच्या सीटवर चक्क बनवला डोसा!
दुचाकीच्या सीटवर चक्क बनवला डोसा!
Published on
Updated on

हैदराबाद ः कॅलेंडरप्रमाणे आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले असले तरी अद्याप मान्सूनने आपल्याकडे वर्दी दिलेली नाही. सध्या तरी लोक भीषण उन्हाचा आणि उकाड्याचाच सामना करीत आहेत. अशा कडक उन्हात वस्तू किती गरम होतात याचे मजेशीर व्हिडीओही अनेक वेळा सोशल मीडियात येत असतात. चारचाकी गाडीवर ऑम्लेट करणारे, वाळूत पापड भाजणारे व्हिडीओ आपण पाहिलेही असतील. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती दुचाकी गाडीच्या तापलेल्या सीटवर चक्क डोसा बनवत असताना दिसते!

उन्हात गाडी लावली की त्यावर बसण्याची कुणाची बिशाद आहे? आता हा व्हिडीओ पाहिल्यावर संबंधित माणसाचे काय हाल होतील हे सहज कळू शकते. हा व्हिडीओ हैदराबादचा असल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये गाडीच्या तापलेल्या सीटवर एक माणूस डोशाचे पीठ ओतून त्याला गोल आकार देतो. काही वेळाने तव्यावर जसा डोसा कुरकुरीत भाजतो तसा हा डोसा भाजला जातो व हा माणूस तो पलटतो! कडक उन्हामुळे आता डोसा, ऑम्लेट करण्यासाठी गॅस, इलेक्ट्रिक शेगडी, स्टोव्ह वगैरेंचीही आवश्यकता राहिलेली नसल्याचे यामधून दिसते! त्यामुळेच आता कधी मोसमी पाऊस सुरू होऊन 'गारवा' निर्माण होईल याची प्रतीक्षा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news