तब्बल २६०० एकर जमिनीवर ‘हे’ आहे विमानांचे कब्रस्तान!

तब्बल २६०० एकर जमिनीवर ‘हे’ आहे विमानांचे कब्रस्तान!

वॉशिंग्टन : विमानतळावर अनेक विमाने उभी असलेली पाहताना अनेकांना आपण अनोखे द़ृश्य पाहतोय असे वाटत असते. मात्र, जर एकाच ठिकाणी तब्बल 4 हजार विमाने उभी असलेली पाहिली तर? अमेरिकेच्या अ‍ॅरिझोनाच्या वाळवंटात हे द़ृश्य दिसून येते. तिथे तब्बल 2600 एकर जमिनीवर फैलावलेल्या भागात 4400 हून अधिक विमाने उभी असलेली दिसून येतात. 'बोनयार्ड' नावाने हा भाग ओळखला जातो. त्याला 'विमानांचे कब्रस्तान' असेही म्हटले जाते.

या बोनयार्डात अनेक प्रकारची प्रवासी विमाने, बॉम्बर, लढाऊ विमाने, यूएव्ही उभी असलेली दिसून येतात. 'डेव्हिस मॉन्थन एअरफोर्स' बेसवर तैनात असलेल्या या विमानांच्या देखभालीची जबाबदारी यूएस एअरफोर्सच्या 309 च्या 'एअरोस्पेस मेंटेनन्स अँड रिजनेरेशन ग्रुप'वर सोपवण्यात आली आहे.

जवानांची ही टीम बोनयार्डमध्ये उभ्या असलेल्या विमानांची दुरुस्ती करून काही विमानांना पुन्हा उड्डाण करण्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करते. उरलेल्या निकामी विमानांचे सुटे भाग बाहेर काढले जातात आणि ते जगभरात पुरवले जातात. हे सुटे भाग इतर विमानांमध्ये वापरले जातात. या एअरबेसचे कमांडर कर्नल जेनिफर बर्नार्ड यांच्या म्हणण्यानुसार इथे तब्बल 800 मेकॅनिक रात्रंदिवस कार्यरत असतात. ते जुन्या विमानांमधून पुन्हा वापर करण्याजोगे भाग काढून त्यांना कार्यक्षम बनवतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news