ज्वालामुखी ओकतो निळ्या रंगाचा लाव्हा

ज्वालामुखी ओकतो निळ्या रंगाचा लाव्हा
ज्वालामुखी ओकतो निळ्या रंगाचा लाव्हा
Published on
Updated on

जकार्ता : इंडोनेशियाच्या जावामधील बानयुवांगी रिजेन्सी आणि बोेंडोवोसो रिजेन्सीच्या सीमावर्ती भागात असा एक ज्वालामुखी आहे की, तो चक्‍क निळा लाव्हा ओकतो. ही आश्‍चर्यचकित करणारी प्राकृतिक घटना आहे. तसेच हा ज्वालामुखी चार अनोख्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. पहिली गोष्ट म्हणजे निळा लाव्हा बाहेर पडतो, दुसरी निळी आग, तिसरे अ‍ॅसिडिक क्रेटर सरोवर आणि चौथे सल्फरची खाण. वेगवेगळी वैशिष्ट्ये असलेल्या या ज्वालामुखीचे नाव 'कावा ईजेन ज्वालामुखी' असे आहे.

'कावा ईजेन ज्वालामुखी'चा शेवटच्या वेळी 1999 मध्ये उद्रेक झाला होता. यातून बाहेर पडणारा लाव्हा नेहमी शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा केंद्र बनतो. या ज्वालामुखीचा काल्डेरा 20 कि.मी. रूंद असून, तो अनेक टेकड्यांमध्ये वसला आहे. यातील गुरुंग मेरापी स्ट्रॅटोवोल्कॅनो नामक एक भयावह सुरुंग असून, तेथूनच निळी आग आणि निळा लाव्हा बाहेर पडतो. गुरुंग मेरापी म्हणजे आगीचा पर्वत.
या ज्वालामुखीच्या विवराचा व्यास तब्बल एक किलोमीटर इतका आहे. याशिवाय जेथून निळा लाव्हा बाहेर पडतो.

तेथील व्यास 722 मीटर असून, सुमारे 200 मीटर खोल आहे. शिवाय येथे निळ्या रंगाच्या पाण्याचे सरोवर असून, ते पूर्णपणे अ‍ॅसिडिक म्हणजे तेजाब आहे. उल्लेखनीय म्हणजे येथूनच लोक खोदाई करून सल्फर घेऊन जातात. या सरोवराला जगातील सर्वात मोठे अ‍ॅसिडिक क्रेटर सरोवर मानले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news