मेष – आरोग्य उत्तम असेल. कुटुंबाला वेळ द्याल, सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल, व्यावहारिकदृष्ट्या लाभदायक दिवस, व्यावसायिक प्रगती होईल.
वृषभ – नियमांचे पालन आवश्यक, सरकारी कामांना प्राधान्य द्या, निर्णय घेताना घाई नको. उत्तरार्धात महत्त्वाची कामे करा.
मिथुन – संभ्रमित अवस्था होईल, आरोग्याच्या तक्रारी संभवतात, वरिष्ठांशी मतभेद होतील, संयमाने वागा, नियोजित कामांमध्ये अडचणी येतील.
कर्क – सामंजस्याने प्रश्न सोडवाल, आपापसांत सुसंवाद साधाल. व्यावसायिकांना लाभदायक दिवस, पूर्वार्ध फायद्याचा राहील.
सिंह – शत्रूंवर मात कराल, हितचिंतकांकडून सहकार्य लाभेल, नोकरदारांसाठी जबाबदारी वाढेल, भागीदारीमधील व्यवसायामध्ये नफा होईल, आनंददायी दिवस.
कन्या – प्रेम प्रकरणांमध्ये अपयश संभवते. वादविवादापासून दूर राहावे, आरोग्याच्या तक्रारी संभवतात, दिवसाचा उत्तरार्ध इच्छा पूर्ण करणारा असेल.
तूळ – घर, जमिनींच्या कामांमध्ये अडचणी येतील, नावलौकिक सांभाळावा लागेल, आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक दिवस, वादविवादापासून दूर राहावे.
वृश्चिक – आत्मविश्वास निर्माण होईल, व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल, कौटुंबिक कलहामुळे मनःस्ताप होईल.
धनु – वादग्रस्त विधानामुळे त्रास होईल, शब्द मागे घ्यावा लागेल, अनावश्यक खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे, आर्थिक लाभ संभवतात.
मकर – आज आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल, मनासारख्या घटना घडतील, कृतज्ञता व्यक्त कराल, व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे.
कुंभ – वात-पित्ताचे त्रास होतील, मानसिक व आर्थिक ताणतणाव निर्माण होतील, उत्तरार्धात सुवार्ता ऐकायला मिळेल, मेजवानीचे योग संभवतात.
मीन – मित्रमंडळींच्या सहवासाने आनंददायी दिवस जाईल. वैवाहिक समस्यांचे निराकरण होईल, आर्थिक प्रगती होईल, संध्याकाळ मनःस्ताप देऊ शकते.