पणजी : पुढारी वृत्तसेवा काँग्रेसतर्फे देशभर भारत जोडो आंदोलन सुरू असताना, गोव्यात काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच काँग्रेस विधिमंडळ गट भारतीय जनता पक्षात विसर्जित केल्याचे जाहीर केले. त्यामुळे गोव्यात काँग्रेसला मोठे भगदाड पडले. 3 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याची आज नाट्यमय पुनरावृत्ती झाली
पक्षांतर केलेल्यांत माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते, मडगावचे आमदार दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते व कळंगुटचे आमदार मायकल लोबो, त्यांच्या पत्नी शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, माजी मंत्री व नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा, सांताक्रूझचे आमदार रुडाल्फ फर्नांडिस, साळगावचे आमदार केदार नाईक, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई व मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर या आठ
आमदारांचा समावेश आहे.
सकाळपासून काँग्रेस आमदार फुटणार, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे पत्रकार पर्वरी येथील सचिवालयाकडे धावले; मात्र पत्रकारांना आतमध्ये प्रवेश रोखण्यात आला. त्यानंतर एकेक काँग्रेस आमदार सचिवालयात दाखल होऊ लागला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही सचिवालयात दाखल झाले.
काँग्रेस विधिमंडळ गटाची बैठक मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली पर्वरी येथील सचिवालयात झाली. त्यानंतर या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. सर्व आठही यामुळे झाले पक्षांतर गोव्यामध्ये काँग्रेसला योग्य नेतृत्व न मिळाल्यामुळे तसेच विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यास गोव्यातील आणि दिल्लीतील काँग्रेसचे नेते अपयशी ठरल्यामुळे आमदारांत नाराजी होती.
गेले अनेक दिवस विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिकामी आहे. माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना या पदावरून काँग्रेसने हटवले, तरी त्यांच्या जागी दुसरा काँग्रेस विधिमंडळ नेता निवडला गेला नव्हता. काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी हे पदयात्रेमध्ये मग्न असल्याने व गोवा प्रभारी व इतर नेते त्यांच्याच भोवती फिरत असल्यामुळे गोव्यातील काँग्रेसच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न काँग्रेसकडून झाले नाहीत. गोव्यामध्ये काँग्रेस आमदारांना कोणी विचारत नाही. काँग्रेसला योग्य नेता नाही आणि मतदारांची कामे तर व्हायला हवीत, यामुळे या आठ आमदारांनी पक्षांतर केल्याचे हे आमदार सांगत आहेत.
आमदारांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा व काँग्रेसचा विधिमंडळ गट भाजपमध्ये विसर्जित करण्याचा निर्णय घेतला व तसा ठराव करून तो सचिवालय सचिवांना दिला. तसेच सभापती गोव्यामध्ये नसल्यामुळे त्यांना ई- मेलही पाठवला. त्यानंतर सर्व आठही आमदारांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेऊन पुढील घडामोडींवर चर्चा केली. या चर्चेनंतर सर्वजण सचिवालयातून बाहेर आले. तोपर्यंत पत्रकारांना सचिवालयाच्या गेटच्या आत घेण्यात आले. यावेळी लोबो, कामत व मुख्यमंत्री यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गोव्यात आणि देशात काँग्रेसला भवितव्य दिसत नाही. गोव्यात विधिमंडळ गटनेता निवडण्यास काँग्रेस अपयशी ठरला आहे. मतदारसंघांचा विकास महत्त्वाचा आहे. आम्हा सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे काम आवडले आहे. त्यामुळे मोदी व डॉ. सावंत यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहे.
गोव्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार चांगले काम करत आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर व बलशाली करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यांचे काम आवडल्यामुळे आणि काँग्रेसची संघटना पूर्ण खिळखिळी झालेली असल्यामुळे मतदारसंघांच्या
विकासासाठी आम्ही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहोत, अशी माहिती दिगंबर कामत यांनी दिली.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला गोव्यातून काँग्रेस छोडो अभियानाने प्रत्युत्तर देण्यात आले असून, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे नेतृत्व गुण नाहीत. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वगुणसंपन्न बलशाली नेतृत्व असून, ते देशाला बलशाली करत आहेत. त्यामुळे भाजपवर लोकांचा विश्वास वाढत आहे. त्याचाच परिपाक म्हणून गोव्यातील आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत देशात भाजपला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागाही भाजपच जिंकेल. 2024 मध्ये नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
प्रवेश काँग्रेसचा त्याग केलेल्या आठही आमदारांनी भारतीय जनता पक्षाच्या पणजी येथील मुख्यालयामध्ये जाऊन तेथे रीतसर भाजपमध्ये प्रवेश केला. रुडाल्फ फर्नांडिस, आलेक्स सिक्वेरा व संकल्प आमोणकर हे पहिल्यांदाच भाजपमध्ये दाखल होत होते. भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश भाजपाध्यक्ष सदानंदशेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व आठही आमदारांना पुष्पगुच्छ देऊन, पक्षाची पावती देऊन आणि भाजपचा शेला प्रदान करून रीतसर भाजपमध्ये प्रवेश दिला.
आज जे 8 काँग्रेस आमदार भाजपमध्ये दाखल झालेले आहेत त्या आठपैकी पाच आमदार हे पूर्वी भाजपशी सलग्न होते. दिगंबर कामत हे तीनवेळा भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले होते. मायकल लोबो हे भाजपच्या तिकिटावर दोनवेला निवडून आले होते.
तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमधील 15 पैकी दहा आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. तीन वर्षांनंतर आज पुन्हा काँग्रेसचे अकरापैकी आठ आमदार भाजपमध्ये दाखल झाले. निवडणुकीपूर्वी भाजपकडे 27 आमदार होते. विधानसभा निवडणुकीत भाजपला 20 जागी विजय मिळाला होता. आता आठ आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपकडे 28 आमदारांचे संख्याबळ झाले असून, मगो पक्षाचे दोन व तीन अपक्ष यांच्या पाठिंब्यामुळे भाजपकडे आता तब्बल 33 आमदारांचे पाठबळ झाले आहे. भाजपच्या तिकिटावर दोनवेळा निवडून आले होते.
आठ आमदारांनी काँग्रेसचा त्याग केल्यामुळे काँग्रेसकडे आता युरी आलेमाव (कुकळ्ळी), अॅड. कार्लोस फेरेरा (हळदोणा) व एल्टन डिकोस्टा (केपे) हे तीन आमदार राहिले आहेत. उत्तर गोव्यात अॅड. फरेरा हे एकमेव, तर दक्षिणेत आलेमाव व डिकोस्टा हे दोन आमदार राहिलेत.
गोव्यामध्ये काँग्रेसला योग्य नेतृत्व न मिळाल्यामुळे तसेच विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यास गोव्यातील आणि दिल्लीतील काँग्रेसचे नेते अपयशी ठरल्यामुळे आमदारांत नाराजी होती. गेले अनेक दिवस विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिकामी आहे. माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना या पदावरून काँग्रेसने हटवले, तरी त्यांच्या जागी दुसरा काँग्रेस विधिमंडळ नेता निवडला गेला नव्हता. काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी हे पदयात्रेमध्ये मग्न असल्याने व गोवा प्रभारी व इतर नेते त्यांच्याच भोवती फिरत असल्यामुळे गोव्यातील काँग्रेसच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न काँग्रेसकडून झाले नाहीत. गोव्यामध्ये काँग्रेस आमदारांना कोणी विचारत नाही. काँग्रेसला योग्य नेता नाही आणि मतदारांची कामे तर व्हायला हवीत, यामुळे या आठ आमदारांनी पक्षांतर केल्याचे हे आमदार सांगत आहेत.