गोंदिया : जावयाने सासऱ्यासह पत्नी, मुलाला पेट्रोल टाकून पेटवले, सासऱ्याचा मृत्‍यू

Washim news
Washim news

गोंदिया ; पुढारी वृत्‍तसेवा गोंदिया शहरानजीक असलेल्या रामनगर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या सुर्याटोला येथे जावयाने आपल्या सास-यासह पत्नी व मुलाला पेट्रोल टाकून जाळल्याची (बुधवार) रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेत सासरे देवानंद मेश्राम (वय 52) रा. सुर्याटोला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर संशयीत आरोपीची पत्नी आरती किशोर शेंडे (वय 35,रा.भिवापूर,ता.तिरोडा) व मुलगा जय किशोर शेंडे (वय 5 रा. भिवापूर, ता. तिरोडा) हे 90 टक्के जळाल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरीता हलविण्यात आले आहे. संशयीत आरोपी जावई किशोर श्रीराम शेंडे (वय 40 रा. भिवापूर, ता. तिरोडा) हा घटनास्थळावरून फरार झालेला आहे.

या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संशयीत आरोपी किशोर शेंडे याच्यासोबत दररोज भांडण होत असल्याने व मारहाण होत असल्याने पत्नी आरती या सासर सोडून गेल्या वर्षभरापासून माहेरी सुर्याटोला येथे राहत होत्‍या. या दरम्यान पोटापाण्याची सोय व्हावी याकरीता येथील सहयोग रुग्णालयात ती नोकरी करीत होती. घटनेच्या दिवशी जेवण करुन त्‍याचे सासरे देवानंद मेश्राम हे घरात बाहेर व पत्नी व मुलगा आत झोपले होते.

यावेळी पती किशोर शेंडे याने आधी सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. त्यानंतर आत झोपलेल्या पत्नी व मुलाच्या अंगावरही पेट्रोल घालून आग लावून तेथून तो पसार झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी तपास सुरु केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेने संपुर्ण सुर्याटोला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news