कुंभोजच्या मंदिरास ’ब’ वर्ग दर्जा

कुंभोजच्या  मंदिरास ’ब’ वर्ग दर्जा
कुंभोजच्या मंदिरास ’ब’ वर्ग दर्जा
Published on
Updated on

हातकणंगले : वृतसेवा कुंभोज येथील ग्रामदैवत हिवरखान बिरदेव मंदिरास 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचे आश्वासन पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी यशवंत सेनेचे हातकणंगले तालुकाध्यक्ष सागर पुजारी यांना दिले. तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे आदेशही त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे कुंभोज पंचक्रोशीतील धनगर समाजाचे स्वप्न लवकरच साकारणार
आहे.

कुंभोज परिसरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. बहुतांशी स्थळांना पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. मात्र, हिवरखान बिरदेव मंदिर या प्रक्रियेतून बाजूला पडले होते. धनगर समाजाची वारंवार मागणी होत होती. परंतु, याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे धनगर समाजातून तीव नाराजी व्यक्त होत होती. याची दखल घेत यशवंत सेनेचे तालुकाध्यक्ष पुजारी यांनी मंत्रालयाच्या पातळीवर पाठपुरावा सुरू केला.

बुधवारी पुजारी यांनी तटकरे यांची भेट घेतली वस्तुस्थिती पटवून देत मंदिर आणि परिसराची भौगोलिक माहिती त्यांच्यासमोर मांडली. मंत्री तटकरे यांनी तत्काळ जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news