कार्तिकच्या ‘शहजादा’ ची जादू पडली फिकी

Shehzada
Shehzada

पुढारी ऑनलाईन : अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'शहजादा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. कार्तिकसह या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत आहे. कार्तिकच्या आधीच्या चित्रपटाच्या मानाने त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यात अपयशी ठरला आहे.

या चित्रपटाच्या म्युझिक, सॅटेलाईट आणि ओटीटी राईटस्मधून निर्मात्यांनी ६५ कोटी रुपये कमावले असले, तरी बॉक्स ऑफिसवर मात्र, हा चित्रपट म्हणावी तशी जादू करू शकलेला नाही. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट काही विशेष कमाई करू शकलेला नाही. प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाने भारतात ७ ते ९ कोटींच्या आसपास कमाई केली आहे. समीक्षक मंडळी या चित्रपटाकडून जास्त अपेक्षा ठेवून होते; पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट पुरताच फसला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news