सोलापूर : ‘इको-फ्रेंडली’साठी महिला मूर्तिकारांचा पुढाकार

सोलापूर : ‘इको-फ्रेंडली’साठी महिला मूर्तिकारांचा पुढाकार
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा अलीकडच्या काळात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करण्याचा ट्रेंड वाढत आहे. मध्यंतरी कोरोना कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सवासह सर्वच उत्सवांवर निर्बंध होते. अशातच गणपती उत्सव मिरवणुका, मंडप, आरास आणि विसर्जन यांच्यावरही कडक निर्बंध आले. पूर्वीपासून सुरू असलेल्या पारंपरिक मातीच्या मूर्तींच्या उत्सवाला या काळात चांगली संधी निर्माण झाली. घरच्याघरी मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना आणि विसर्जन करण्यात आले. सध्या सोलापुरातील काही महिला मूर्तिकार यासाठी पुढाकार घेत आहेत.

मागील 12 वर्षांपासून मधूर सोलापूरकर या वृक्षविनायक ही संकल्पना राबवित आहेत. पर्यावरण रक्षणाचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे. विविध प्रकारच्या मातींचे कंपाऊंड व काही संस्कृतीस अनुसरून वस्तूंचा वापर करीत त्यांच्या शिवकृपा बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून या मूर्ती बनविल्या जातात. मातीच्या खरेदीपासून, त्याचे मिश्रण तयार करणे, त्या लगद्यापासून साच्यातून मूर्ती बनविणे, रंगरंगोटी आणि त्याच्या विक्री व्यवस्थापनेपासून प्रसिद्धीचे काम केवळ महिलाच करतात. शिवकृपा बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक ग्राहकाला पर्यावरणरक्षक म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते. बाळी वेस जाजू भवन येथे हे मूर्ती विक्री केंद्र आहे. यात संस्थेच्या वैशाली गुंड, आरती आरगडे, श्रीदेवी पाटील, छोटे कलाकार समृद्धी, आनंदी, आर्यन यांच्यासह अनेकांचा हातभार असतो.

हे आहेत वृक्षविनायकाचे विशेष

वृक्षविनायक गणपती मूर्ती बनविताना माती, हळद, खळ, भीमसेनी कापूर, गाईचे शेण, डिंक यांचा वापर केला जातो. मूर्ती बनविताना पावित्र्य राखले जाते. रंगकामासाठी खायचे रंग, अरगजा, हळद-कुंकू व वॉटर कलरचा वापर केला जातो. मूर्ती घेणार्‍या ग्राहकाला पुन्हा काळी माती, विविध प्रकारच्या घरगुती झाडांच्या बिया मोफत दिल्या जातात, जेणेकरुन मूर्ती घरात विसर्जित केल्यावर त्याच मातीत काळी माती मिसळत बिया लावल्या जाव्यात व त्यांचा वृक्षविनायक त्यांच्याच घरात एका वृक्षाच्या रूपाने राहावा, हा उद्देश आहे.

केवळ व्यवसाय म्हणून आम्ही मूर्ती विक्री करीत नाही. प्रदूषण टाळत पर्यावरणाच्या रक्षणाचे काम आम्ही आमच्यापरीने करतो. अवघ्या 151 रुपयांपासून उंचीने अडीच फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती असतात. वर्षभर मूर्ती बनविण्याचे काम चालते. ते जे समाधान आहे, ते वेगळे आहे.
– मधूर सोलापूरकर, वृक्षविनायक परिवार प्रमुख

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news