पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या घरी नवा पाहुणा लवकरच येणार आहे. नोव्हेंबरमध्ये ती बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या नव्या पाहुण्यासाठी कपूर कुटुंबीयांप्रमाणेच चाहतेही उत्सुक आहेत.
बाळाच्या आगमनाची जय्यत तयारी कपूर कुटुंबीयांकडून केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आलिया 20 ते 30 नोव्हेंबरदरम्यान बाळाला जन्म देऊ शकते. विशेष म्हणजे, आलियाची बहीण शाहीन हिचा वाढदिवसही 28 नोव्हेंबरलाच असतो.
गिरगावातील 'एच. एन. रिलायन्स' रुग्णालयात आलिया तिच्या बाळाला जन्म देणार आहे. या रुग्णालयात तिचं नाव नोंदविण्यात आलंय. आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम दिवाळीपूर्वीच पार पडला. त्याला बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.