…आणि ‘स्पायडरमॅन’ आपटला छतावर!

...आणि ‘स्पायडरमॅन’ आपटला छतावर!
...आणि ‘स्पायडरमॅन’ आपटला छतावर!
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः एका इमारतीवरून दुसर्‍या इमारतीवर जाळ्याच्या सहाय्याने लिलया उड्या मारत जात असलेला स्पायडरमॅन पाहून काहींना त्याची नक्कल करण्याचीही जीवघेणी लहर येत असते. मात्र, काही लोक इमारतींवर सहजपणे चढून जाण्यात कुशलही असतात. आता एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये एक स्पायडरमॅन उंच उडी घेत येतो आणि दुसर्‍या इमारतीच्या छताच्या कठड्यावर आपटतो! सुदैवाने हा कुणी माणूस नव्हता तर रोबो होता!

अमेरिकेतील डिस्ने कॅलिफोर्निया अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये या स्पायडरमॅन रोबोने केलेला स्टंट सपशेल फसला. खरे तर 'सुपरहीरो' हे काल्पनिक असतात आणि टीव्हीवर किंवा चित्रपटांमध्ये त्यांनी दाखवलेले स्टंट हे निव्वळ तंत्रज्ञानाची करामत असते. वास्तवात त्याचे अनुकरण करणे चांगलेच महागात पडू शकते. याठिकाणी एका रोबोलाही ते तसेच महागात पडले! या घटनेचा व्हिडीओ कुणीतरी स्मार्टफोनवर रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियात टाकला. तो लगेचच व्हायरलही झाला. पंधरा सेकंदांच्या या व्हिडीओला दोन दिवसांत 1.18 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काहींना वाटले की हा माणूस आहे आणि त्याचा भीषण अपघात झाला. मात्र, तसे काही नसून हा केवळ एक रोबो होता. त्याची फजिती तसेच असल्या स्टंटचा काय परिणाम होऊ शकतो हे यामधून पाहायला मिळते!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news