कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ : आंदोलनाचा 100 वा दिवस

आंदोलनाचा 100 वा दिवस
आंदोलनाचा 100 वा दिवस

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा जयप्रभा स्टुडिओ बचाव आंदोलनाच्या शंभराव्या दिवशी थेट पालकमंत्री सतेज पाटील यांच्या ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मंगळवारी (दि. 24) सकाळी ठीक 11 वाजता जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कलाप्रेमींतर्फे जयप्रभा स्टुडिओ बचावासाठी गेले 100 दिवस जयप्रभा स्टुडिओच्या दारात आणि विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. कोल्हापूरचा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाचविण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार व मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांना अनेक वेळा निवेदने दिली. याबाबत नगरविकास मंत्र्यांसोबत बैठक लावण्याचे आश्‍वासन दिले गेले. पण ते आजपर्यंत पूर्ण झाले नाही.

याची आठवण करून देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याबाबत घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात धनाजी यमकर, रणजित जाधव, इम्तियाज बारगीर, श्याम गोलदाज, मिलिंद अष्टेकर, राहुल राजशेखर, रंगकर्मी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news