अमानुष : व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमधून काढले; अँडमिनची जीभ कापली

अमानुष : व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमधून काढले; अँडमिनची जीभ कापली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : व्हॉटस्अॅप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून ग्रुप अॅडमिनला पाच जणांनी बेदम मारहाण करून त्याची जीभ कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात बुधवारी (दि. २८ डिसेंबर) हा थरारक प्रकार घडला.
याप्रकरणी प्रीती किरण हरपळे नावाच्या ३८ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार दाम्पत्य व आरोपी एकाच सोसायटीत राहतात.

सोसायटीतील रहिवाशांचा तक्रारदारांच्या पतीने 'ओम हाईटस् ऑपरेशन' नावाने व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला होता. त्यात सर्व सदस्य होते. तक्रारदार महिलेचे पती या ग्रुपचे अॅडमिन होते. यावेळी त्यांनी यातील एकाला ग्रुपमधून रिमूव्ह केले. ग्रुपमधून काढून टाकल्याने संबंधिताला राग आला. नंतर त्याने अन्य चौघांच्या मदतीने ग्रुप अॅडमिनच्या तोंडावर लाथा-बुक्क्या हाणल्या. यात त्यांच्या दाताला आणि जिभेला मार लागला आणि जीभ कापली गेली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news