पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेन आणि रशियावर यांच्यातील युद्धाचा १४ वा दिवस आहे. यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनने अनेक देशांना मदतीचा हाक दिली, मात्र बलाढ्य रशियाच्या दहशतीपुढे सर्व देशांचा आवाज थंड झाला. नाटोमध्ये सामील होणे, हे एक महत्वाचे कारण या युद्धातील आहे. पण, सध्या वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे की, "युक्रेन आता नाटोमध्ये सहभागी करून घेण्याचा हट्ट करणार नाही." (झेलेन्स्की नरमले!)
झेलेन्स्की यांच्या बोलण्यावरून असे दिसून येत आहे की, त्यांना पराभव स्वीकारला आहे. ते म्हणाले की, "ज्या दोन प्रांतांवरून रशियाने युद्ध सुरू केले होते, त्या प्रांतांसंदर्भात युक्रेन चर्चा करण्यास तयार आहे." २४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनमधील दोन विद्रोही प्रांत असणाऱ्या लुहान्स आणि डोनेत्स्क यांनी स्वतंत्र राज्य घोषीत केले होते.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना झेलेन्स्की म्हणाले की, "मला पहिल्यांदाच लक्षात आले होते की, नाटो युक्रेनला कधीच स्वीकरणार नाही. त्यामुळे याविषयी विचार करणे सोडून दिले होते. मी अशा राष्ट्राचा राष्ट्रपती कधी बनणार नाही, जो गुडघे टेकून कोणाकडे तर भीक मागेल."
रशियाला भीती होती की, नाटोचे सैनिक युक्रेनपर्यंत आले होते. त्यामुळे ते तेथून माॅस्कोदेखील जास्त दूर नव्हते. रशियाने केलेल्या मागण्यांसदर्भात झेलेन्स्की म्हणाले की, "आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. आम्हाला फक्त सुरक्षेची हमी हवी आहे. या दोन प्रांतांवर कोणत्याही देशाचे नियंत्रण नाही. रशियाने या प्रांतांवरील नियंत्रणाचा दावा केला आहे. रशिया स्वतः एक रिपब्लिक देश आहे. सध्या मी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी तयार आहे. गरजचेचे आहे की, ज्या लोकांना ते प्रांत युक्रेनचा भाग व्हावेत, अशांना शांततेने राहू दिले जावे." (झेलेन्स्की नरमले!)
हेही वाचलंत का?