जामखेड; पुढारी वृत्तसेवा : राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून जामखेडमधील नागेश विद्यालयाच्या मैदानावर 15 हजार स्क्वेअर फूटमध्ये जगातील सर्वात मोठे राजमाता जिजाऊ यांचे रेखाचित्र तयार केले आहे.
चित्रकार उद्देश पघळ यांनी हे चित्र साकारले असून, नागेश विद्यालयाचे कलाशिक्षक मयूर भोसले व सीसी'च्या विद्यार्थ्यांनी चित्र तयार करण्यासाठी विशेष सहकार्य केले. अवघ्या चार दिवसांत रेखाचित्र पूर्ण झाले आहे.
चित्र साकारण्यासाठी किल्ले बांधणीसाठी वापरण्यात येणार्या बेसॉल्ट खडकाच्या दगडाचा वापर करण्यात आला असून, पांढरा व काळ्या चुन्याचा रंगवण्यासाठी वापर केलेला आहे. 12 जानेवारी रोजी या रेखाचित्राचे उद्घाटन होणार आहे.