कोलाड ः पुढारी वृत्तसेवा : श्रीमंत असो अथवा सर्वसामान्य माणूस अथवा अत्यंत गरीब माणूस असो यांच्या स्वयंपाकात लसूणची फोडणी दिल्याशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही अशा लसणसाची किंमत भरमसाठ वाढली असून सर्व गृहिणीचे बजेट कोलमोडले?आहे. या लसणाची किंमत एका किलोला 500 रुपयेच्या वर गेल्यामुळे ही लसुण ग्राहकांच्या मानगुटीवर बसलेली आहे. ( Garlic )
संबंधित बातम्या
मांसाहारी असो अथवा शाहाकारी जेवण सर्वांच्या स्वयंपाकात लसणाची फोडणी दिल्याशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही याच लसणाची किंमतीत भरमसाठ वाढ झाली असुन या लसणाच्या किंमतीने जणू उचांक गाठला आहे. लसणाचा दर प्रती किलो 120 रुपयांपर्यंत होता
परंतु, हाच दर गेली पंधरा दिवसानंतर 520 रुपयांवर गेला आहे. म्हणजेच 50 रु. किलो लसणाचा भाव 6000 रुपये होता तो आता 26000 रुपयांवर गेला असल्यामुळे या लसणाची खरेदी कमी झाल्यामुळे याचा पर्याय म्हणून किराणा दुकानात मिळणार्या वेगळ्या कंपनीच्या लसणाच्या पेस्ट चा वापर करण्यासाठी गृहिणीने सुरुवात केली असली तरी हे लसणाचे भाव असेच वाढले तर लसणाच्या पेस्टच्या ही किंमती वाढतील.
केव्हा डाळी व कडधान्य भाव तसेच केव्हा कांदे व भाज्यांचे भाव कडाडले जात आहेत तर आता लसणाचे भाव गगणाला भिडले आहेत परंतु लोकनेते मात्र येणार्या निवडणुकीसाठी विविध ठिकाणी सभेला गुंतले आहेत ते फक्त नोकर दार्यांच्या वेतन भत्त्यात वाढ करीत आहेत परंतु कोरोनात असंख्य लोकांच्या नोकर्या गेल्या त्यांना दिवसाला दोनशे ते तीनशे रुपये कमवणे कठीण झाले आहे अशा लोकांचे काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे. ( Garlic )