smartphone : स्मार्टफोनच्या खाली असलेल्या ‘या’ छिद्राचा उपयोग काय?

smartphone : स्मार्टफोनच्या खाली असलेल्या ‘या’ छिद्राचा उपयोग काय?
Published on
Updated on

नवी दिल्ली ः दिवसातील बराचसा वेळ आपण ज्या फोनवर घालवतो त्यातील काही फीचर्स किंवा त्यावर असणार्‍या विविध टॅब्सचा वापर कशासाठी होतो हे बर्‍याच वेळा माहीत नसते. फोनच्या सर्वात खाली चार्जिंग होलच्या जवळ एक अगदी लहानसा होलही असतो. बर्‍याचदा तो फोनच्या डिझाईनचा एक भाग असेल असे गृहीत धरून, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकांना हे छिद्र नेमके कशासाठी आहे, याबाबत माहिती नसते. त्याचा विचार केला तर ते दिसायला खूप लहान असते, परंतु त्याचा उपयोग पाहिला असता तो प्रचंड मोठा आहे. परंतु, बर्‍याच लोकांना या होलची स्मार्टफोन वापरात भूमिका काय आहे? हे माहिती नसते. चला तर मग स्मार्टफोनच्या खालच्या बाजूला

लहान छिद्र का असतो? जाणून घेऊयात ः

या छिद्राला 'नॉईज कॅन्सलेशन मायक्रोफोन' म्हणतात. जेव्हा आपण फोनवर बोलत असतो तेव्हा हे छिद्र आपल्या आजूबाजूला होणारा आवाज रोखण्याचे काम करते. हा लहानसा मायक्रोफोन तुम्ही जर फोनवर बोलताना गोंगाटात असाल तर मागून येणारा संपूर्ण आवाज कॉलवर असणार्‍या व्यक्तीपर्यंत पोहोचू देत नाही. बर्‍याच वेळा आपण ट्रॅफिकमध्ये असताना फोनवर बोलत असतो. अशावेळी आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचा आवाज मोठ्याने चालू असतो. परंतु, तरीसुद्धा आपल्या आजूबाजूचा आवाज पलीकडच्या आपण ज्या व्यक्तीशी बोलतो त्याला ऐकू न येता फक्त आपलाच आवाज त्याला व्यवस्थित ऐकायला जातो. जेव्हा आपण अशावेळी फोनवर बोलत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला चालू असणारा आवाज थांबवण्याचे महत्त्वाचे काम या होलच्या माध्यमातून केले जाते. अशा पद्धतीने स्मार्टफोनच्या खाली असलेल्या या लहानशा होलचे मोठे कार्य आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news