Arthritis : संधिवात : समज-गैरसमज

Arthritis : संधिवात : समज-गैरसमज

श्री सद्गुरू माधवनाथ तथा दादा महाराज सांगवडेकर यांच्या संकल्पाने आणि श्री आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री निरंजनदास सांगवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे 11000 स्क्वेअर फुटांमध्ये कार्यरत असलेले श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर, कोल्हापूर हे संपूर्ण महाराष्ट्रातील अग्रगण्य आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे, जेथे सर्व आजारांवर शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक उपचार दिले जातात. (Arthritis)

"आधिवाध्यी विनाशाय स्वस्थाजीवन वृत्तये।
विश्ववती चिकित्सालय विश्व कल्याण हेतवे ॥"

हे धोरण पुढे ठेवून, येथे माफक दरात अनेक सुविधा दिल्या जातात. सर्व प्रकारच्या शारीरिक तसेच मानसिक रोगांसाठी शास्त्रोक्तनाडी परीक्षा, आयुर्वेदिक निदान आणि चिकित्सा, औषधीकरण, नवनवीन व्याधींवर रिसर्च आणि औषधी निर्माण, सर्व प्रकारचे पंचकर्म, नियमित योगोपचार वर्ग तसेच योग प्रशिक्षक वर्ग येथे घेतले जातात. तसेच आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे, आयुर्वेदाबद्दल असलेले दूषित पूर्वग्रह दूर करणे, लोकांमध्ये जागृती करण्याचे कामदेखील चिकित्सालयामार्फत केले जाते. या अंतर्गतच आजच्या विषयाकडे आपण वळूया…

संधिवात : समज-गैरसमज

संधिवात म्हटला की, अनेक जणांना खूप काळजी वाटते; काही तरी भयानक आजार झाला आहे आणि आता यातून काही सुटका नाही, असे अनेक गैरसमज अनेकांच्या मनात येतात. सांधेदुखी, तीव्र वेदना, वेदनांमुळे हालचालींवर आलेल्या मर्यादा या सर्वांना रुग्ण सामोरे जात असतो आणि त्यात भर म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी पसरवलेले संधिवाताबद्दल अनेक गैरसमज. आता काय बाबा, आयुष्यभर दुखणं सुरू तुमचं, नेहमीच औषधे घ्यावी लागणार, वगैरे वगैरे. परंतु, हा आजार आयुर्वेदाच्या उपचाराने पूर्णतः बरा होऊन तो पुन्हा उद्भवू नये याकरिता सुधा आयुर्वेद खूप सशक्तआहे, हे खूप लोकांना माहिती नसते; तर आज आपण त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…

संधिवात म्हणजे नेमके काय?

सामान्यतः जेथे दोन गोष्टी जोडल्या जातात त्यांना 'संधी' म्हणतात. संधिवातामध्ये हाडांच्या संधींचा विचार केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास अनेक कारणाने शरीरात वाढलेला वात जेव्हा कोणत्याही संधींच्या ठिकाणी जातो आणि वेदना, सूज उत्पन्न करतो आणि त्याच्या कार्यात अडथळा निर्माण करतो तेव्हा त्याला 'संधिवात' म्हणतात. साधारणतः उतरत्या वयात होणारा हा आजार सध्या खूप अलीकडे म्हणजे तरुण पिढीमध्येसुद्धा दिसून येतो, तो का, हे आपण बघूया…

संधिवात कशामुळे होते?

आहारातील कारणे

अनियमित जेवणाच्या वेळा, जेवणात तिखट-खारट जास्त घेणे (चटणी, ठेचा), विरुद्ध अन्न सेवन (फळे-दूध, दूध-भात-मीठ एकत्र घेणे), बेसनचे पदार्थ (भजी, वडा), मैद्याचे पदार्थ (बिस्कीट, खारी, टोस्ट) मोड आलेले कडधान्य जास्त घेणे, पनीर, चीझ यांची अतिशयोक्ती, फ्रिजचे थंड पाणी घेणे, शिळे पदार्थ, बटाटा, जेवणात तुपाचा अभाव अशी अनेक वात वाढवणारी कारणे संधिवाताला कारणीभूत ठरतात.

विहारातील कारणे

सतत गार पाण्याने अंघोळ करणे, गार वार्‍यात फिरणे, अउ मध्ये जास्त वेळ काम करणे, अतिजास्त प्रवास, खूप बोलणे, उशिरा झोपणे, रात्री जागरण, दुपारची झोप, व्यायामाचा अभाव आणि अतिशयोक्ती सुद्धा (थंडीमध्ये कुडकुडत वॉकिंग करणे), नियमित शौचास नीट न होणे, वेगावरोध करणे (उदा. शौच, लघवी, अधोवायू तटवून ठेवणे) अशी अनेक कारणे ही संधिवाताला कारणीभूत असतात.

संधिवाताची लक्षणे कोणती ?

संधींच्या ठिकाणी वेदना आणि सूज येणे, हालचाल करताना आवाज येणे, हालचाल करताना वेदना होणे म्हणून हालचालींचर मर्यादा येणे, वातपूर्णदृतिवत स्पर्श म्हणजे संधींना हात लावला असता वाताने भरलेल्या पखालीला हात लावला आहे, असे वाटणे ही लक्षणे संधिवातामध्ये दिसून येतात.

हा कोणताही सांध्यांना होऊ शकतो; परंतु मोठ्या सांध्यांपासून त्याची सुरुवात होते, जसे गुडघा, खांदा, इत्यादी. ( Arthritis )

मला होणारे सांध्यांचे दुखणे, हे नक्की संधिवात आहे हे ओळखायचे कसे?

सांध्यांचे अनेक आजार आयुर्वेदात सांगितले आहेत. कोणताही सांधा दुखतो म्हणजे तो लगेचच संधिवात झाला हा गैरसमज पहिल्यांदा दूर करूयात. एखादा सांधा का दुखतो यामागे अनेक कारणे असतात. कुठे मुक्का मार लागला होता का, ताप येऊन मग दुखणे सुरू झाले आहे का, इ. अनेक गोष्टींचा विचार करून नक्की सांधेदुखी ही संधिवातामुळे आहे की आमवात, वातरक्त अशा इतर व्याधींमुळे आहे, हे आपण वैद्याकडे जाऊन तपासून घेतले पाहिजे. श्री विश्ववती येथे रुग्णाची पूर्णतः History घेऊन शारीरिक परीक्षण तसेच विशेषतः नाडी परीक्षण करून अचूक निदान केले जाते.

संधिवाताची चिकित्सा काय?

अचूक निदान हे चिकित्सेच्या दृष्टीने उचललेले सर्वात महत्त्वाचे पाऊल. सांधेदुखी हे संधिवातामुळे झाली आहे, हे निदान झाल्यावर त्यानुसार वैद्य चिकित्सा करतात. आयुर्वेदात अनेक चिकित्सा सांगितल्या आहेत. त्यामध्ये वात कमी करणारी औषधी, स्नेहन (तेल लावणे), स्वेदन (वाफ देणे), रक्तमोक्षण, बस्ती इ. सारखे पंचकर्म, विविध प्रकारचे लेप, अग्निकर्म (सोन्याच्या शलायेने दुखणार्‍या जागी डाग देणे), यांचा समावेश होतो. हे सर्व उपचार वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावेत.

किती दिवस औषधे घ्यावी लागतात?

दुखणे जर नवीन असेल, हल्लीच उद्भवले असेल, वय कमी असेल तर चिकित्सा लवकरच फलदायी ठरते. ( Arthritis )

संधिवात परत होऊ नये, याकरिता काही करता येते?

आयुर्वेदामध्ये अपुनर्भव चिकित्सा ही लेपलशिीं खूप सुंदर आहे. व्याधी होऊन गेली की ती परत उद्भवू नये याकरिता घेण्याची काळजी यात सांगितली जाते. अजून एक गैरसमज जो संधिवाताबद्दल लोकांच्या मनात असतो तो म्हणजे एकदा का संधिवात झाला की हवामान बदलल्यास, अपथ्य केल्यास त्रास उद्भवणारच. ते होऊ नये याकरिता आपणही अपुनर्भव चिकित्सा वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करावी. यामध्ये पंचकर्म, आहार-विहारातील पथ्य वैद्य सांगत असतात.

तर या संधिवाताला घाबरून न जाता, योग्य निदान, योग्य औषधोपचार घ्या आणि त्याला कायमचा निरोप आयुर्वेदाच्या औषधोपचारांनी द्या. (Arthritis)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news