विधानसभा अध्यक्षांकडून मुस्कटदाबी केली जातेय : नाना पटोलेंचा आरोप

नाना पटोले
नाना पटोले

नागपूर; पुढारी वृतसेवा : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. पण हा अविश्वास प्रस्ताव वर्षभराच्या आत आणता येत नाही असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच आपल्याला याबाबत माहित नाही, मी यावर सही केली नाही असे सांगत यातली गंभीरता कमी केली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

सहा महिन्यांपूर्वी मांडलेला विश्वास प्रस्ताव होता. अविश्वास प्रस्ताव आम्ही नियमानुसारच आणला आहे. दोन आठवड्यात सभागृहाच्या कामकाजात विरोधकांना जनतेचे प्रश्न मांडू देण्यात आले नाहीत. आमची अध्यक्षांकडून मुस्कटदाबी केली जात असून हे अधिवेशन केवळ पर्यटनासारखंच झालयं. या सरकारकडे पुरेसे मंत्री नाहीत, दोन हजार लक्षवेधी मागण्या मांडल्या आहेत असेही पटोले यांनी सांगितले आहे.

पण लक्षवेधींना उत्तरं देताना मंत्री नाहीत. गेल्या दोन अधिवेशनात ७८ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्यात, त्याला काही आधार नाही. राज्यपाल नियमबाह्य काम करीत आहे. हे विषय अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करताना मी मांडले असेही ते म्हणाले. गेंड्याच्या कातडीपेक्षाही जाड कातडीचे सरकार असल्याची टीका नाना पटोले यांनी यावेळी केली आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news