आयुर्वेदानुसार त्रिदोष- वात, पित्त, कफ यांच्यापैकी कोणत्याही एका दोषाचे प्रमाण कमी अधिक झाल्यास शरीर अस्वस्थ होते. जल शामक मुद्रा शरीराच्या आतील कफ दोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. ही मुद्रा शरीरातील जल तत्त्व कमी करून पाण्याचा वापर आणि त्याच्या प्रवाहाचा क्रम यांच्यावर प्रभाव टाकते.
या मुद्रेचा वापर शरीरात जमा होणारे अतिरिक्त पाणी कमी करण्यास मदत करते. या मुद्रेसाठी हाताची करंगळी वाकवून तिच्या टोकावर अंगठा ठेवावा. करंगळी अंगठ्याने दाबावी. ह्या मुद्रेचा 10 ते 30 मिनिटे नियमित सराव करावा. ही मुद्रा करण्यासाठी विशिष्ट वेळेचे बंधन नाही. त्यामुळे ती मुद्रा कधीही, कोणत्याही परिस्थितीत करू शकतो. सकाळी ध्यानधारणा करताना या मुद्रेचा सराव केल्यास त्याचा चांगला आणि लवकर परिणाम होऊ शकतो.