Sangli Lok Sabha : विशाल पाटलांना उमेदवारी मिळू न देण्यामागे जयंत पाटीलच खलनायक: विलासराव जगतापांचा घणाघात 

विलास जगताप
विलास जगताप

जत: पुढारी वृत्तसेवा: सांगली जिल्ह्यात सध्या ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत, राजकारण घडत आहे. वसंतदादाच्या नातवाला तिकीट मिळविण्यासाठी मुंबई, दिल्ली, नागपूर असे हेलपाटे घालावे लागतात. ही दुःखद घटना आहे. विशाल पाटील यांना काँग्रेसचे तिकीट मिळू नये, हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून चालू आहे. या खेळातील खरा खलनायक जयंत पाटील आहेत. संजय राऊत यांच्याद्वारे जयंत पाटील यांनी ही खेळी खेळली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात जयंत पाटीलच कळीचे नारद असल्याचा घणाघाती आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला. Sangli Lok Sabha

जत येथे विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ माजी आमदार विलासराव जगताप यांचे समर्थक व प्रमुख कार्यकर्त्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी अपक्ष उमेदवार विशाल पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, मनोज सरगर, लक्ष्मण बोराडे, कुंडलिक दुधाळ, प्रमोद सावंत, संग्राम जगताप, आण्णा भिसे, राजू चौगुले आदी उपस्थित होते. Sangli Lok Sabha

विलासराव जगताप यांनी आपल्या खास शैलीत भाजपसह खा. संजयकाका पाटील यांच्यासह जयंत पाटील यांचा समाचार घेतला.
जगताप म्हणाले की, ज्या शिवसेनेचा जिल्हात ग्रामपंचायत सदस्य नाही, अशा व्यक्तीला तिकीट देऊन त्यांच्यासाठी आग्रह धरला. यासाठी संजय राऊत यांच्या माध्यमातून विशाल पाटील यांच्या विरोधात षड्यंत्र रचले. राऊत हे माझ्या भेटीसाठी आले असता त्यांना सांगितले होते की, जिल्ह्यात संजय पाटील यांचा पराभव करण्यासाठी विशाल पाटील हा एकमेव पर्याय आहे. मात्र, जिल्ह्यात मोठे षडयंत्र रचण्यात आले.

वसंतदादा घराणे कायमस्वरूपी राजकारणातून संपविण्याचा विडा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे पर्यायी नेतृत्व म्हणून वसंतदादा घराणे आपल्याला जिवंत ठेवायचे आहे. एखादा विरोधी प्रतिस्पर्धी संपवायचे हा राजकारणातला गलिच्छ प्रकार सुरू झाला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी दादा घराणे संपवणे हे निंदाजनक आहे. दादा व बापू हा वाद पूर्वीपासून होता. मात्र, त्यांनी कोणालाही संपवण्याचा प्रयत्न केला नाही. अशा घाणेरड्या राजकारणाला बळी पडू नये, असेही ते म्हणाले.

Sangli Lok Sabha खासदार संजय काकावर टीकास्त्र

माजी आमदार जगताप यांनी खासदार पाटील यांचा देखील खरपूस समाचार घेतला. खासदार पाटील यांनी गेल्या दहा वर्षात मान हलवणे या व्यतिरिक्त दुसरे काहीच केले नाही. नेमके हो म्हणतात का नाही म्हणतात हे देखील कळत नाही. आपण बहुतांशी शेतकरी वर्ग आहे. आपण आपल्या दावणीला मान हलवणारे जनावर ठेवत नाही. मग आपण मान हलवणारा हा प्राण्याचे काय करायचे, ते तुम्हीच ठरवा, असे म्हणाताच बैठकीत हास्य निर्माण झाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news