पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई उच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी वरावरा राव यांची याचिका फेटाळली. वरावरा राव यांच्यासह अरूण फरेरा आणी वर्नोन गोंन्सालविस याच्याकडून न्यायालयाने डिसेंबर २०२१ मध्ये देण्यात आलेल्या निर्णयाबाबत पुर्नविचार याचिका दाखल केली होती. तिघांचाही जामीनास न्यायालयाने नकार दिला आहे.
न्यायमूर्ती एस.एस शिंदे आणि न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या खंडपीठाने २०२१मध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये कोणत्याही तथ्यात्मक त्रुटी नसल्याचे म्हटलं आहे. उच्च न्यायालयाने मागील वर्षी आठ आरोपींना जामीन देण्यासाठी नकार दिला होता. तर सहआरोपी सुधा भारद्वाज यांना उच्च न्यायालकडून जामीन मंजूर करण्यात आला होता.
आर सत्यनारायण यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या याचिकेत वरावरा राव, फरेरा आणि गोन्सालविस यांच्याबाबत दिलेल्या २०२१ च्या निर्णयात कथित त्रुटी सुधारण्याची मागणी केली होती. सोबत त्यांना जामीन मंजूर व्हावा, अशी मागणी केली हाेती.