Vajramuth Sabha : ‘शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारच’, आदित्य ठाकरेंचा घणाघात

Vajramuth Sabha : ‘शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारच’, आदित्य ठाकरेंचा घणाघात

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार बसले आहे. पण मी लिहून देतो की हा सगळा थोड्याच दिवसांचा खेळ आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, असा घाणाघात आदित्य ठाकरेंनी केला. ते मुंबईतील वज्रमुठ सभेत बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकतरी महिला, मुंबईचा अस्सल मुंबईकर दिसला आहे का? ना मुंबईचा, ना पुण्याचा आवाज आहे. मंत्रीमंडळ पाहिले तर हे बिल्डर आणि कंत्राटदारांचे सरकार झाले आहे, अशी टीका राज्य सरकारवर त्यांनी केली.

'जसा अवकाळी पाऊस असतो त्याचप्रमाणे हे अवकाळी सरकार राज्याच्या सत्तेत बसले आहे. शेतकऱ्याचा आवाज ऐकणारे या सरकारमध्ये कोणी नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उघडपणे शिव्या गद्दारांकडून दिल्या जातात. पण अशांची हकालपट्टी झालेली नाही. सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोलणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. अनेक प्रकल्प राज्यातून निघून गेले आहेत,' असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

राज्यातील घटनाबाह्य सरकारचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे वाटतात का? आजच्या दिवशी गुजरातकडे दोन मुख्यमंत्री आहेत असे वाटत आहे. एक तिकडचे खरे आणि दुसरे आपल्याकडे बसलेले. पण आपल्याकडे मुख्यमंत्री नसल्यासारखा कारभार सुरू आहे. या अंधारातून आपल्याला बाहेर पडाचे आहे. वज्रमूठ एकत्र करून आपल्याला या गद्दारांना हद्दपार करायचे आहे, असा हल्लाबोलही आदित्य ठाकरे यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news